बांदा येथे स्मशानभूमीतील कचऱ्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य…
रोगराई पसरण्याची भीती असल्याने तात्काळ योग्य ते आदेश द्या; साईप्रसाद कल्याणकरांची आरोग्य विभागाकडे मागणी…
बांदा
येथील स्मशानभूमीत टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले. त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे योग्य की उपाययोजना करा, अशा प्रकारचे आदेश बांदा सरपंचांना द्यावेत, अशी मागणी तेथील नागरिक साईप्रसाद कल्याणकर यांनी आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.
या स्मशानभूमीच्या परिसराला लागून मानवी वस्ती आहे. त्यामुळे त्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरून स्थानिक लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेता तात्काळ योग्य ती उपाययोजना राबवा आणि तशा प्रकारच्या सूचना देऊन स्मशानभूमी स्वच्छ करून घ्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
