मथुरेत कृष्ण जन्मभूमीत फोंडाघाटच्या बालगोपाळांचा, कृष्णलल्लाचा जयघोष घुमणार
सुमारे 30 युवाईचे दिल्ली आग्रा मथुरा कडे प्रस्थान !
फोंडाघाट
सलग चौथ्या वर्षी फोंडाघाटच्या बालगोपाळ मंडळातील सुमारे ३० युवकांनी दिल्ली- आग्रा- मथुरा या ठिकाणी सहल तथा अभ्यास दौऱ्याचे आयोजन करून, कृष्ण जन्मभूमी मथुरेकडे प्रस्थान केले. पूर्वसंधेला बाजारपेठेतील श्री देव राधाकृष्ण मंदिरात,सहलीत सहभागी सर्वांना, उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या वतीने श्रीफळ ठेवून निर्विघ्न आणि सुखकर प्रवासासाठी सांगणे करून निरोप देण्यात आला …
पेठेतील मंडळाचे कार्यकर्ते आणि युवा व्यापारी यांचे वतीने दरवर्षी सहलीचे — अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले जाते. यावेळी मोपा ते दिल्ली व परत असा विमान प्रवास सर्वांचेच आकर्षण,अनुभव आणि शिकवण ठरणार आहे. या सहली दरम्यान सर्वजण दिल्लीमध्ये अक्षरधाम मंदिर, युनिस्को वर्ल्ड हेरिटेज स्थळ, ऐतिहासिक मुगल राजधानी स्थळ, कुतुब मिनार,इंडिया गेट, लोटस टेम्पल व इंदिरा गांधी म्युझियम, राष्ट्रपती भवन, फिरोजशहा कोटला मैदान, पार्लमेंट हाऊस, राष्ट्रपती भवन इत्यादी अनुभवणार आहेत. आग्रा येथील ताजमहाल व आग्रा फोर्ट पाहून पुढे वृंदावन गार्डन आणि मथुरा येथे कृष्ण जन्मभूमीचे — याची डोळा दर्शन घेणार आहेत,आणि त्यावेळी फोंडाघाटच्या बालगोपाळांकडून मथुरे येथील कृष्ण जन्मभूमीत, राधाकृष्णाचा जयजयकार घुमणार आहे. यातून हिंदू संस्कृती आणि कृष्णाच्या जीवन चरित्राची माहिती घेण्याचा सर्वांचा प्रयत्न राहील. अतिशय विलक्षण अनुभव देणाऱ्या या सहली बद्दल प्रस्थान ठेवताना सर्वांनीच कुतुहल व्यक्त केले.
त्यामुळे सहलीचा निरोप पेठेमध्ये कृष्णलल्लाच्या घोषणांनी दुमदुमून गेला. या सहलीमध्ये अक्षय कुबडे, गणेश भुवड, हेमंत म्हापसेकर, मनोज पेडणेकर, प्रकाश साळवी,सागर मरिये, सिद्धेश मोदी, विनोद मोदी, नागेश कोरगावकर,ओंकार पिळणकर, रितेश माणगावकर, संतोष पारकर, विवेक आपटे, आनंद पावस्कर, ओंकार भोगले ,मिथिल पटेल,दत्तप्रसाद बिडये,सचिन भोगले, संतोष पेडणेकर,सिद्धेश साळवी, गजानन पेडणेकर, विठोबा ताईशेटे,अमित पारकर,दिनेश मोदी, दीपक पेडणेकर इत्यादी सहभागी झाले आहेत..,
