वेंगुर्लेतील दोन अधिकारी राज्यपालांच्या हस्ते “राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी ” पुरस्काराने सन्मानित…
वेंगुर्ले
वेंगुर्ले तालुक्यातील परुळेबाजार व मेढा ग्रामपंचायत अधिकारी श्री.शरद श्रीरंग शिंदे तसेच केळुस ग्रामपंचायत अधिकारी श्री. विवेक रमेश वजराटकर यांचा यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरीबद्दल व राज्यस्तर ,आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणुन महाराष्ट्रचे राज्यपाल महामहिम श्री. सी.पी. राधाकृष्णन व ग्रामविकास मंत्री श्री. जयकुमार गोरे यांच्या हस्ते आणि ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री श्री योगेश कदम व प्रधानसचिव श्री एकनाथ ङवले यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील परुळेबाजार व मेढा ग्रामपंचायत अधिकारी शरद श्रीरंग शिंदे यांना सन २०२२ – २०२३ चा शासन आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर झाला होता. तर केळुस ग्रामपंचायत अधिकारी विवेक रमेश वजराटकर यांना सन २०२३ -२०२४ चा राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण राज्यपाल यांच्या हस्ते करण्यात आले.
दोन्ही अधिकारी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित झाल्याने त्यांचे जिल्ह्यासह तालुकास्तरावरून अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र राज्य शासनातर्फे जिल्हा परिषद स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी यांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. कोकण विभागातून व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. वेंगुर्ले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांनी दोन्ही अधिकाऱ्यांचे खास कौतुक आणि अभिनंदन केले आहे.
