You are currently viewing मुसळधार पावसामुळे नेमळेत शेतविहीर कोसळली, शेतकऱ्याचे हजारोंचे नुकसान…

मुसळधार पावसामुळे नेमळेत शेतविहीर कोसळली, शेतकऱ्याचे हजारोंचे नुकसान…

मुसळधार पावसामुळे नेमळेत शेतविहीर कोसळली, शेतकऱ्याचे हजारोंचे नुकसान…

सावंतवाडी

नेमळे- गावडेवाडी येथील शेतकरी दत्ताराम राघोबा मालवणकर यांच्या मालकीची शेतविहीर मुसळधार पावसामुळे कोसळली आहे. यामुळे मालवणकर यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. मालवणकर यांनी ही दगडी विहीर दहा वर्षांपूर्वी बँकेकडून कर्ज घेऊन बांधली होती. या विहिरीचा उपयोग ते माड बागायती, आंबा कलम तसेच शेतीसाठी करत असत. उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या काळात आजूबाजूची कुटुंबेही या विहिरीचे पाणी पीत असत. सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ही शेतविहीर कठड्यासहित कोसळून जमीनदोस्त झाली आहे.

या घटनेनंतर शेतकरी दत्ताराम मालवणकर यांनी त्वरित नेमळे ग्रामपंचायतीला कळवून अतिवृष्टीमुळे कोसळलेली विहीर पुन्हा बांधून मिळावी, अशी मागणी केली आहे. यावेळी नेमळे ग्रामसेवक चौहान, तलाठी पोळ, सरपंच दीपिका भैरे, उपसरपंच सखाराम राऊळ आणि लिपिक राजा गवस यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा