*यवतमाळच्या ऑटो चालकाच्या आयएएस झालेल्या अदिबा अनम या मुलीचा जाहीर सत्कार*
*वडील ड्रायव्हर : मुलगी कलेक्टर*
*यवतमाळच्या अदिबा अनमने रचला इतिहास*
म्हणतात ना कोशिश करने वालो की कभी हार नही होती
पंख होने से कुछ नही होता हौसोलो से उडान होती है
हा शेर यवतमाळच्या ऑटो रिक्षा चालकाच्या मुलीला तंतोतंत लागू होतो. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयएएस परीक्षेमध्ये तिने 142 वा क्रमांक प्राप्त करून पूर्ण जगात यशाची पताका रोवली आहे. तिला येणारे फोन हे विविध देशातून येत आहेत. ही भारतातील पहिली मुस्लिम महिला विद्यार्थिनी आहे की जी इतक्या कमी वयामध्ये मोठ्या रँकने आयएएस ही परीक्षा उत्तीर्ण झाली आहे .
कौन कहता है की आसमान मे सुराग नही होता
एक तो पतथर तबीयत से उठायो यारो
या शेराप्रमाणे अदिबाने मनापासून हृदयापासून तन-मन धनाने एक दगड उचलला. पहिल्या प्रयत्नात अपयश आले. दुसरा तिसरा प्रयत्न वाया गेला आणि चौथा दगड तिला यशस्वी करून गेला .
विदर्भातील यवतमाळ हे शेतकऱ्याच्या आत्महत्येसाठी प्रसिद्ध आहे .भारतातल्या सगळ्यात जास्त आत्महत्या या जिल्ह्यात झाल्या आहेत. तसा हा मागासलेला जिल्हा .या जिल्ह्यामध्ये आदिवासी क्षेत्र जंगली क्षेत्र जास्त आहे. याच यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ या गावात कळम चौकात अशफाक नावाचे ऑटो रिक्षा चालक आहेत .पण हा माणूस फारच मोठा व्यक्ती असला पाहिजे. ए फॉर ऍक्टिव्ह असेच म्हणावे लागेल. मुस्लिम समाजामध्ये आणि तेही महिलांमध्ये साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प आहे. पण या माणसाने स्वतःच्या मुलीला नुसतं शिकवलेच नाही तर आयएएस या सर्वोच्च परीक्षेमध्ये गुणवत्तेने उत्तीर्ण करून दाखविले आहे .
जितने वाले कोई अलग काम नही करते
वे हर काम अलग ढंग से करते है
साधारणपणे सर्वसामान्य माणसाची स्वप्ने काय असतात . ऑटोरिक्षा चालकांची स्वप्न काय असतात. पण ती साधी सरळ असतात .आपल्या मुलाने कमवावे. पोटापाण्यापुरते. एवढे किमान त्यांची अपेक्षा असते .डॉक्टर आणि इंजिनीयरची फी ते भरू शकत नाहीत आणि कलेक्टर होण्याचे स्वप्नही पाहू शकत नाहीत. जे पाहतात ते कमी असतात. पण ते स्वप्न अशफाक भाईंनी पाहिले . तसेच अदिबाला आयएएस होण्यासाठी तिच्या मामाने प्रेरित केले .
साथी हात बढाना
एक अकेला थक जायेगा
मिलकर बोज उठाना
मामाने आयएएसचे बाळकडू पाजले. अदिबा सर्वसामान्य शाळेमध्ये शिकली. यवतमाळ येथे नगरपालिका जिल्हा परिषद या शाळांमध्ये शिकली .पदवी करण्यासाठी सदाबहार व्यक्तिमत्व आजम कॅम्पसचे श्री पी ए इनामदार साहेब तिच्या मदतीला आले. श्री पी ए इनामदार हा माणूस सर्वसामान्यमध्ये मिसळणारा. सर्वसामान्य लोकांना मदत करणारा .ते इनामदार साहेब अदिबाच्या मदतीला आले. पुण्याच्या सुप्रसिद्ध आझम कॅम्पस मधून तिने पदवी केली.
मुंबईचे हज हाऊस तिच्या आय ए एस च्या ट्रेनिंग साठी मदतीला आले .हज हाऊस मध्ये तिने परीक्षेची प्रारंभिक तयारी केली. नंतर ती दिल्लीला गेली. दिल्लीची जामिया युनिव्हर्सिटी अदिबासारख्या मुलांच्या पाठीशी नेहमी उभी राहिली आहे. या विद्यापीठाने अदिबाच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरविले. हम दर्द नावाच्या संस्थेने तसेच यवतमाळच्या सेवा या संस्थेने आपल्या मदतीचा हात तिच्यापर्यंत पोहोचला
पहिला दुसरा तिसरा प्रयत्न असफल झाला. पण चौथ्या प्रयत्नात अबिदाला आय ए एस मिळाले .ज्या वडलाने तिला मोठे केले. तिला वेगवेगळया संस्थेमध्ये पाठवले . ते वडील म्हणतात माझ्याकडे येणाऱ्यांची जाणाऱ्यांची फोनची एवढी संख्या वाढली आहे की माझा माझे कान हँग झाले आहेत.
आम्ही जेव्हा अमरावती वरून अदिबाचा सत्कार करण्यासाठी यवतमाळला गेलो. तेव्हा तिच्या घरापर्यंत जाण्यासाठी आम्हाला यवतमाळचे सत्यशोधक कार्यकर्ते श्री विलास काळे हे मदतीला आले. त्यांनी अदिबाच्या वडिलांना आमच्या आगमनाची वार्ता दिली होती.आणि कळम चौकातून वळणे घेत आम्ही अदिबाच्या घरी पोहोचलो. घराच्या बाहेरच वडील ड्रायव्हर असल्याचा पुरावा उभा होता. तिच्या लहानशा घरात आम्ही कसेबसे बसलो. आमची संख्या जास्त होती. घर लहान असले तरी अशफाक भाईचे मन मोठे होते. त्यांनी लगेच आमच्या सर्वांसाठी कोल्ड्रिंक बनविले. मी पाहिले तिच्या घरी बुकेचा ढीग लागला होता. एखाद्या कलेक्टर झालेल्या मुलाकडे एवढा मोठा बुकेचा एवढा मोठा ढीग लागलेला मी माझ्या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये पहिल्यांदाच पाहत होतो. तिचे वडील म्हणाले की लोकांचे सतत येणे सुरू आहे. सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री एवढेच नाही तर देशातल्या आणि परदेशातल्या अनेक लोकांचे सतत फोन येत आहेत. ते फोन इतक्या मोठ्या प्रमाणात येत आहेत की माझा कान फोन घेऊ घेऊ हँग झाला आहे.
तिचे स्वागत करायला प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी गावातील जिल्ह्यातील परिसरातील लोकांची रिघ लागली आहे. अशफाक भाईच्या डोळ्यात पाणी आले. ते म्हणाले माझी पोरगी एवढी मोठी होईल असे मला वाटले नव्हते .मी माझे घर विकायला काढले .मी माझा ऑटो विकायला काढला. कारण मुलीला आय ए एस करायचे होते .आज ते स्वप्न पूर्ण झाले आहे.
तेवढ्यात अदिबा आली. आम्हा सगळ्यांना तिने नमस्कार केला. आम्ही अमरावतीच्या मिशन आय ए एस. च्या वतीने तिचा सत्कार केला. तिला सन्मानपत्र दिले. तिला बोलके केले. ती म्हणाली सर माझ्या मामांनी मला खरी प्रेरणा दिली .ते सतत मला आयएएस बद्दल सांगत होते. आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलाखती दाखवत होते. खरंतर मी नगरपालिकेच्या शाळेत जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकले. पण मनापासून शिकली. मला माहित होतं की मी जर आता अभ्यास केला तर मला फळ निश्चित मिळणार आहे. पुण्याच्या आझम कॅम्पसचे तुम्ही नाव ऐकले आहे. श्री इनामदार साहेबांनी मला खूप मदत केली. तसेच यवतमाळच्या सेवा या संस्थेने माझ्या पाठीशी उभे राहण्याचे ठरविले. हज हाऊस युनिक अकादमी जमिया यूनिवर्सिटी दिल्ली यांनी खरोखरच मदतीचा हात पुढे केला. सर आमच्या समाजामध्ये मुली जास्त शिकत नाहीत. पण मी ते स्वप्न पाहिले. मनापासून प्रयत्न केला. मला माहीत होतं की कोशिश करने वालो की कभी हार नही होती मी रात्रंदिवस अभ्यास करत होते .पहिले एक दोन प्रयत्न झाले .मी माझ्या चुका शोधल्या आणि त्याच चुका दुरुस्त केल्या आणि चौथ्या प्रयत्नांमध्ये मी पास झाले. सर मला 142 बँक मिळाली आहे .मी शंभर टक्के कलेक्टर होणार आहे .पण मी कलेक्टर झाल्यानंतर चूप बसणार नाही .माझ्या समाजातील नाही तर माझ्या यवतमाळ मधील जो जो मुलगा स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असेल त्याला मदत करायला मी तयार आहे . नव्हे ते माझे कर्तव्य आहे.
अदिबा बोलत होती. आम्ही ऐकत होतो .आमच्यासमोर तिचे व्यक्तिमत्व वयाने जरी लहान असले तरी ती आयएएस झाल्यामुळे आयएएस चा तन-मन धनाने अभ्यास केल्यामुळे तिच्या ठिकाणी परिपक्वता आली होती आणि ती तिच्या शब्दातून व्यक्त होत होती .ती म्हणाली सर माझ्या परिस्थितीची मला जाणीव आहे. माझ्या वडिलांनी ऑटो विक्रीला काढला होता .माझ्या वडिलांनी घर विकायला काढले होते .सेवा संस्था नसती तर आम्ही बेघर झालो असतो. त्यांनी मदतीचा हात खऱ्या अर्थाने आम्हाला दिला. तुम्ही माझे घर पाहता. माझ्या परिसर पाहता. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आहोत. पण मी अभ्यासाने श्रीमंत आहे .आणि त्यामुळेच केंद्रीय लोकसेवा आयोगाने मला सिलेक्ट केले आहे. मी तिला अमरावतीला येण्याचे निमंत्रण दिले.
रविवार दि. 18 मे 2025 रोजी आमचे मित्र व सेवा संस्थेचे श्री याहयाखान यांनी अमरावतीला सायंकाळी सात वाजता अमरावतीच्या वलगाव रोडवरील जमील कॉलनी येथील नॅशनल मॉल सभागृहात अदिबाचा सत्कार ठेवला आहे. त्यांनी आमदाराना बोलावले .प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलावले .मला पण बोलावले. तसेच तिला मदत करणाऱ्या सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावले .आम्हा अमरावतीसाठी ही मोठी संधी आहे. ज्या ज्या पोरांना कलेक्टर व्हावेसे वाटते. प्रशासकीय सेवेत जावेसे वाटते .मोठे व्हावेसे वाटते. त्यांनी अदिबाचे अनुभव ऐकण्यासाठी रविवार दिनांक 18 मे रोजी सायंकाळी सात वाजता वलगाव रोडवरील जमील कालनी मध्ये आले पाहिजे .तिचे अनुभव ऐकले पाहिजेत .
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस .अमरावती कॅम्प
9890967003
