*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक साहित्यिक विनय सौदागर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*होळी*
मुळावरच असा घाव घातलात
की मी एकदम उन्मळून पडलो
मग वाजत गाजत मिरवणूक काढताय
काय साध्य करायचंय तुम्हाला?
काय सिद्ध करायचंय तुम्हाला?
आणि निष्प्राण धडाला पुन्हा उभं करताहात
नाचताहात फेर धरून त्याचेभोवती उन्मादाने
असली कसली परंपरा ही
मी ओरडत होतो
पण माझी हाळी न ऐकताच
माझी होळी करून तुम्ही मोकळे झालात.
*विनय सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
9403088802
