You are currently viewing खारेपाटण येथे सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सह.पतसंस्थेच्या नवीन शाखा कार्यालयाचे उद्घघाटन संपन्न

खारेपाटण येथे सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सह.पतसंस्थेच्या नवीन शाखा कार्यालयाचे उद्घघाटन संपन्न

“वैश्य समाज बरोबरच समाजातील इतर घटकासाठी सुद्धा बँकेने काम करावे…” – प्रमोद जठार,माजी आमदार

खारेपाटण :

 

“सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्थेने वैश्य समाजा बरोबरच समाजातील इतर घटकांच्या सुधा समस्या जाणून त्यांना अत्यावश्यक असणारा कर्ज पुरवठा संस्थेने केल्यास त्यांचे बँकेत रूपांतर होऊन प्रगतीपथावर जायला वेळ लागणार नाही.” असे भावपूर्ण उध्दगार माजी आमदार प्रमोद जठार यांनी सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सह.पतसंस्था फोंडाघाटच्या खारेपाटण येथील नूतन शाखा कार्यालयाच्या उद्घघाटन प्रसंगी कार्यक्रमात बोलताना काढले.”

सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सह.पतसंस्था फोंडाघाट च्या १३ व्या नवीन शाखा कार्यालयाचे उद्घघाटन आज खारेपाटण शिवाजीपेठ येथे माजी आमदार प्रमोदजी जठार यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.यावेळी खारेपाटण गावच्या सरपंच सौ प्राची इसवलकर, माजी जि.प.सदस्य श्री रवींद्र जठार, कणकवली तालुका वैश्य समाज अध्यक्ष श्री महेंद्रकुमार मुरकर, राजापूर अर्बन बँक चे व्यवस्थपक श्री सचिन पवार,सिं.जि.वैश्य समाज सह. पतसंस्थेचे चेअरमन श्री दिलीप पारकर,व्हाइस चेअरमन सुभाष भिसे,संचालिका माधवी मुरकर,अनिता रेवडेकर, मुख्य कार्य.अधिकारी ईश्वरदास पावसकर,खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत,वीरेंद्र चीके, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, खारेपाटण व्यापारी असो.अध्यक्ष प्राजल कुबल,विजय देसाई,भाऊ राणे,गुरू शिंदे,संकेत शेट्ये,रवी शेट्ये,सूर्यकांत भालेकर,एकनाथ कोकाटे,सुरेंद्र कोरगावकर,मंगेश गुरव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

खारेपाटण शिवाजी पेठ येथील बाजारपेठ मध्ये सिं.जि.वैश्य समाज सह.पतसंस्थेच्या कार्यालयाचा शुभारंभ झाल्यानंतर खारेपाटण हायस्कूलच्या कै.चंद्रकांत परिसा रायबागकर सभागृहात संस्थेचा पुढील कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.तर संस्थेचे संस्थापक कै.दादा कोरगावकर व दादा भिसे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वरदास पावसकर यांनी प्रास्तविक करीत संस्थेच्या कामकाजाचा आजपर्यंतचा आढावा घेतला.

खारेपाटण येथील नुतन शाखेच्या उद्घघाटन प्रसंगी वैश्य समाज पतसंस्थेच्या वतीने खारेपाटण पंचक्रोशीतील विविध शेत्रातील काम करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

तर संस्थेचे अध्यक्ष दिलीप पारकर, जि.प.सदस्य श्री रवींद्र जठार , खारेपाटण सरपंच – प्राची इसवलकर,संचालक – सुनील कोरगावकर, खारेपाटण व्यापारी असो.अध्यक्ष प्राजल कुबल,वैश्य समाज अध्यक्ष महेंद्रकुमार मुरकर आदींनी वैश्य समाज पतसंस्थेच्या नूतन शाखा कार्यालयाला शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले.

माजी आमदार प्रमोद जठार पुढे म्हणाले कोकणातील लोक श्रीमंत झाले.तर येथील बँक श्रीमंत होतील.मात्र कोकणच्या ताकतीचा विचार कोकणातीलच लोकांना माहीत नाही आहे.म्हणून सहकारी संस्थांनी आणि बँकांनी युवा उद्योजकांना कर्ज देऊन सक्षम बनविले पाहिजे.मात्र कोकणात येणाऱ्या उद्योगांना विरोध करून आपणच आपले नुकसान करून घेत आहोत.शासनाच्या विवध कर्ज योजना संस्थांनी कर्जदारांना पटवून देऊन कर्ज वितरण केल्यास बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल.त्यामुळे संस्थेतील कर्मचारी वर्ग कसा आहे यावर त्या संस्थेचे भवितव्य अवलंबून असते.असे प्रतिपादन आमदार प्रमोद जठार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना काढले.”

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री काका सावंत यांनी केले तर सर्वांचे आभार श्री अरविंद शिरसाट सर यांनी मानले.या कार्यक्रमाला खारेपाटणसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा