You are currently viewing वैभववाडी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

वैभववाडी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

वैभववाडी

आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी आणि बी. के. एल. वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.२३ जुन २०२३ रोजी स. १०.०० ते दु. ०३.०० या वेळेत आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी येथे मोफत वैद्यकिय आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात हर्निया, अपेंडिक्स, अल्सर, थायरॉईड, मुळव्याध, मुतखडे, प्रोस्टेट ग्रंथी, मोतिबिंदू, चरबीच्या गाठी, टॉन्सिल्स, पित्ताशयातील खडे, कान, नाक, घसा, गर्भाशयाचे आजार, त्वचा रोग तपासणी इ. आजारांची मोफत तपासणी करण्यात येणार असून आवश्यक असल्यास पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारकांच्या मोफत शस्त्रक्रीया करण्यात येणार आहेत. तरी गरजुंनी श्री. प्रविण पेडणेकर ८२७५५२४६१६, श्री. सुधिर नकाशे ७७४३९८६०८८, श्री. राजेंद्र राणे ७७७३९३७०७०, श्री. संजय रावराणे- ९४२२३७९३४५, श्री. राजु पवार ९६५७२५९०८० यांच्याकडे आपली नांव नोंदणी करावी.
वैभववाडी येथे होत असलेल्या मोफत वैद्यकिय आरोग्य तपासणी व शस्त्रक्रीया शिबिराचा लाभ गरजूंनी मोठ्या प्रमाणात घ्यावा, असे आवाहन महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे स्थानिक समिती सचिव श्री.प्रमोद रावराणे यांनी केले आहे.

 

*संवाद मिडिया*

*🧑🏻‍🎓प्रवेश..सुरू ! प्रवेश..सुरू ..!! प्रवेश..सुरू ..!!!🧑🏻‍🎓*

📣 *B. C. A. DEGREE*

*BCA Degree ला ॲडमिशन म्हणजे संगणक क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी.*🧑‍💻🧑‍💻

*👉 प्रवेश पात्रता…*
*▪️प्रथम वर्ष बीसीएकरिता: कोणत्याही शाखेची बारावी परीक्षा (गणित किंवा गणिताशिवाय) किमान ४५ टक्के व मागासवर्गीयांसाठी ४० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण*
*▪️थेट द्वितीय वर्ष बीसीएकरिता: डिप्लोमा पदवीका प्रथम श्रेणीत उत्तीर्ण (सिव्हिल इंजिनियर व्यतिरिक्त)*
*▪️मर्यादित प्रवेश उपलब्ध*

*संपर्क:*
*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वुमन्स*
*(एसएनडीटी महिला विद्यालय, मुंबई संलग्न)*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*

*📱 ७९७२९९७५६७, ९४२०२७४११९*

*Advt Link*
https://sanwadmedia.com/98807/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा