You are currently viewing बांद्यातील बस स्टँड समोरील बोगदा सुरू होईपर्यंत महामार्गावर पोलीस यंत्रणा कार्यान्वित करा – ग्रामपंचायत सदस्यांची मागणी

बांद्यातील बस स्टँड समोरील बोगदा सुरू होईपर्यंत महामार्गावर पोलीस यंत्रणा कार्यान्वित करा – ग्रामपंचायत सदस्यांची मागणी

बांदा

येथील बस स्टँड समोर मुंबई-गोवा महामार्गाच्या खालून पायी व दैनंदिन वाहतुकीसाठी असलेला बोगदा पाईपलाईनचे काम सुरू असल्यामुळे बंद ठेवण्यात आला आहे. परिणामी नागरिकांना हायवे ओलांडून जावे लागत आहे. तर दुसरीकडे शाळा महाविद्यालय सुद्धा सुरू होत असून विद्यार्थ्यांना देखील या गैरसोईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे महामार्गावर अपघात घडू नये यासाठी महाविद्यालय सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळी त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा कार्यान्वित करून योग्य त्या उपाय योजना राबवाव्यात, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, रत्नाकर आगलावे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. याबाबत पोलीस निरीक्षकांना आज निवेदन देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा