*खाकिचे शिलेदार “धापू वरात” च्या ग्रीन सिग्नलमुळे जुगाराची मैफिल जोरात*
*मोरजेच्या नीतल्याच्या जुगाराच्या मैफिलीत दोन हजाराच्या नोटांचा सुकाळ*
कणकवली जवळील गावांमध्ये जुगाराचे अड्डे बिनधास्तपणे सुरू आहेत. खाकी वर्दीचा आशीर्वाद लाभल्याने रात्री सुरू होणारे जुगाराचे अड्डे पहाटे पर्यंत जोरदार चालतात.
कणकवली तालुक्यातील *”शंकरडाव”* गावातील जुगाराची मैफिल “धापू वरात” या खाकीच्या शिलेदारांच्या आशीर्वादाने राण्यांचा “सन्मान” नावाच्या व्यक्तीच्या बंद घरात मंगळवारी रात्री ११.०० वाजता सुरू झाली, ती पहाटे ३.०० वाजता आटोपती घेण्यात आली.. “धापू वरात” च्या ग्रीन सिग्नलमुळे बस ड्रायव्हर असलेल्या मोरजेच्या नितल्याची जुगाराची मैफिल चांगलीच बहरात आली आहे. अलीकडे दृष्टीस न पडणाऱ्या दोन हजारांच्या नोटा पटावर खेळताना नजरेस पडतात. *रत्नागिरी येथील यासिर कादम चाचा* या जुगारासाठी काल पासून कुडाळ येथे मुक्कामी राहिला आहे. पांढरे शुभ्र कपडे, धिप्पाड शरीरयष्टी कादम पानावर टाकतो लाखाच्या पटीत रक्कम…!
*”शंकरडाव”* गावातील राण्यांच्या सन्मान असलेल्या घरातील जुगारात मंगळवारी रात्री रिद्धेश बांदेकर याने पहिला पट मारला, दुसरा शिर्केंच्या बाप्पा ने तर तिसरा बस ड्रायव्हर मोरजेच्या नितल्याने मारला आणि हात चलाखी करून सर्व अंदर केले. या जुगारात तक्षिमदार सावंतवाडीच्या सावंतांचा विशाल हृदय असलेला, कणकवलीतील खेळेकर, डॅडी नावाने ओळखला जाणारा “घाईत”, आणि आत्मा म्हणजेच राम म्हणतात तो ओवळीये, सावंतवाडी येथील फावडे हे सामील होते. गाळवन येथील संदप्याला खेळींची काळजी घेण्यासाठी रात्रीत १५००/- तर लेप्टो नावाने परिचित असलेल्या चहा, पाणी, सिगारेट, गुटखा पुरवणाऱ्याला १०००/- रुपये पगार दिला जातो. त्यामुळे जुगाराच्या अवैद्य धंद्यात *खाकी ते बाकी* पर्यंत सर्वांची चांदी होते आणि खेळी मात्र हरून लुटून जातात.