You are currently viewing झाले मोकळे आकाश

झाले मोकळे आकाश

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित सर्वोत्कृष्ट क्रमांक प्राप्त काव्यरचना*

*झाले मोकळे आकाश*
( अष्टाक्षरी रचना )

*सर्वोत्कृष्ट*

*” बंध जिव्हाळ्याचे “*

झाली धावती दुनिया
जिवलग जाती दूर
कसा जुळावा एकोपा
वाटे मनी हुरहूर ||

होते अपेक्षांचे ओझे
कोणी न माघार घेती
प्रेमासवे द्वेष ईर्षा
हात धरुनिया येती ||

खोटे रुसवे फुगवे
किती दिसांचा दुरावा
मानपान रागापायी
उगा अबोला धरावा ||

नाती दुरावली व्यर्थ
होती मनोमनी खंत
वाटे सरावी रुष्टता
पुन्हा फुलावा वसंत ||

गुढीपाडव्याचा सण
खास निमित्त मिळाले
रम्य अशा संध्याकाळी
गणगोत जमा झाले ||

गळामिठी गप्पागोष्टी
मनोमनी मुक्त झाले
आपोआप संवादाचे
सुसंवाद ऐकू आले ||

दाटलेले मेघ सारे
गेले अवघे विरून
झाले मोकळे आकाश
मनी आनंद भरून ||

ज्योत्स्ना तानवडे.
वारजे, पुणे.५८

 

*संवाद मिडिया*

⭕ _*प्रवेश सुरु ! प्रवेश सुरु !! प्रवेश सुरु !!!*_ ⭕

डिस्टिंक्टिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ….
*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी, मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट, दापोली.*
(संलग्न मुंबई विद्यापीठ, मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)

*शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू….*

*👉हॉटेल मॅनेजमेंट (Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे
आजच आपला प्रवेश निश्चित करा.
📚 वैशिष्टये 📚
▪︎ १०० % प्लेसमेंट.
▪︎५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪︎ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*
*पत्ता – ता.दापोली , जि. रत्नागिरी*

📱संपर्क क्रमांक :
*9420156771 / 7057421082 / 9028466701 / 9527873432*

*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा