राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडिस यांची मागणी
कार्यकारी अभियंता यांना दिले निवेदन :शिरवल ते कळसुली लिंक लाईन सर्व्हे करुन तोडगा काढणार
कणकवली :
कणकवली तालुक्यातील कळसुली गावाला ओरोस फिडर वरुन होत असलेला वीजपुरवठा कणकवली विभागामार्फत सुरु करावा. अशी मागणी कळसुली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता श्री बाळासाहेब मोहिते यांच्या कडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी कळसुली ग्रा.पं. सदस्य कल्पेश सुद्रीक,ग्रा.प.सदस्य भावना तावडे, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप सावंत, विनोद कळसुलकर, डेव्हिड फर्नांडिस,प्रज्ञेश देसाई, मिलिंद सावंत आदी उपस्थित होते.
मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी कळसुली च्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता श्री बाळासाहेब मोहिते यांची कणकवली येथे भेट घेतली.आणि निवेदन दिले. कळसुलीगावाला ओरोस फिडरवरुन विदयुत पुरवठा सुरु आहे. मात्र, कणकवली तालुक्यातील कळसुली हे एकच गाव कुडाळ विभागात येते.त्यामुळे तेथील फिडर वर दुर्लक्ष केला जातो.परिणामी याचा फटका कळसुली येथील वीज ग्राहकांना बसत आहे.त्यामुळे कळसुली येथील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे.त्यामुळे शिरवल ते कळसुली लिंक लाईन करुन कणकवली विभागामार्फत वीज पुरवठा करण्यात यावा.अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडिस यांनी कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्या कडे केली.
यावेळी म.रा.वि.वि.कपंनीचे कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी शिरवल ते कळसुली लिंक लाईन करणेबाबत सर्व्हे करण्यात येईल.आणि त्यानंतर याबाबत तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन यावेळी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला दिले.