सावंतवाडी
सावंतवाडी तहसीलदारपदी श्रीधर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीधर पाटील यांनी यापूर्वी सावंतवाडीचे प्रभारी तहसीलदार म्हणून काम पाहिलं होतं. त्यानंतर या ठिकाणी तहसीलदार म्हणून अरुण उंडे यांच्याकडे कार्यभार देण्यात आला होता. ते ६ महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीकरिता सावंतवाडी इथं कार्यरत होते.
त्यांचा हा कालावधी संपल्याने रिक्त झालेल्या जागी पुन्हा एकदा श्रीधर पाटील यांना कार्यभार देण्यात आला आहे. तत्कालीन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या जागी श्रीधर पाटील यांना नियुक्ती देण्यात आली होती. त्यावेळी ते ओरोस येथे कार्यरत होते. तर सद्यस्थितीत त्यांच्याकडे मालवण व कुडाळ अशी दुहेरी जबाबदारी होती. श्रीधर पाटील हे कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सर्वसामान्यांची कामे जलद गतीने होण्यावर नेहमी त्यांचा भर असतो. त्यांच्या नेमणूकीने सर्वसामन्यांतून समाधान व्यक्त होत आहे.