You are currently viewing कुडाळ तहसीलदार कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन

कुडाळ तहसीलदार कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन

 

कुडाळ :

 

संत तुकाराम महाराज देहू येथे वारकरी समाजावर लाठीचार्ज झाला याच्या निषेधार्थ आज दिनांक 13 जून रोजी कुडाळ तहसीलदार कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने भजन करून टाळ वाजून आंदोलन करणार आहे. यावेळी आमदार कुडाळ मालवणचे आमदार श्री वैभवजी नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजयजी पडतेराष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमितजी सामंत ,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख उपस्थित राहणार आहेत. तरी महाविकास आघाडीच्या शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडी कुडाळ तालुक्याच्या वतीने श्री अभय शिरसाठ, राजन नाईक,भास्कर परब यांच्या वतीने करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा