You are currently viewing आतुरता

आतुरता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कविता भावगीत*

 

*आतुरता*

 

भेट तुझी होता माझा, जीव हा रंगला
मुक्त जगण्याचा मज, सूर गवसला ||धृ||

रात्रंदिनी मज स्वप्नी, मुखडा दिसतो
मनातल्या मनात मी, एकटा हसतो
टकमक पाहता त्या, रुपात फसला
मुक्त जगण्याचा मज, सूर गवसला ||१||

ओळखीचे झाले बघ, तुझे हे इशारे
स्पर्श होता तनालागे, बोलले शहारे
हाती हात देता मनी, मोगरा फुलला
मुक्त जगण्याचा मज, सूर गवसला ||२||

गालावर खेळतसे, कुंतलाची बटा,
लाली येता गाली खुले, गुलाबाची छटा
खळी पडता गाली हा, मदन भुलला
मुक्त जगण्याचा माज, सूर गवसला ||३||

© दीपक पटेकर {दीपी}
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा