You are currently viewing एस. टी. कर्मचाऱ्यांचे वेतन न दिल्यास भारतीय जनता पार्टी तर्फे आंदोलनाचा इशारा….

एस. टी. कर्मचाऱ्यांचे वेतन न दिल्यास भारतीय जनता पार्टी तर्फे आंदोलनाचा इशारा….

सावंतवाडी :

गेल्या अनेक महिन्यापासून एस.टी कर्मचाऱ्यांचे वेतन दिले गेले नसल्याने अनेक ठिकाणी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना घडत आहेत. या राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे व आघाडी सरकारच्या बिघाडी कामामुळे कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ या सरकारने आणली आहे.
कर्मचाऱ्यांच्या या सर्व भावनांचा भारतीय जनता पार्टी सावंतवाडी आदर करून त्यांच्या पूर्ण पाठीशी आहे. आणि आघाडी सरकारने कर्मचाऱ्यांचे वेतन व त्यांच्या गरजा भागवण्यास विलंब केला तर भारतीय जनता पार्टी सावंतवाडी तर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. याबाबतचे निवेदन भारतीय जनता पार्टी बांदा मंडल व सावंतवाडी शहर यांच्या मार्फत देण्यात आले.
यावेळी बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, बांदा मंडल उपाध्यक्ष उमेश पेडणेकर, समीर गावडे सरपंच, बांदा मंडल अध्यक्षा धनश्री गावकर, बांदा मंडल महिला सचिव राखी कळंगुटकर, विकास केरकर, नगरसेवक आनंद नेवगी, युवा मोर्चा अध्यक्ष सावंतवाडी शहर संदेश टेंबकर, अजय सावंत, अमित परब, गुरु मठकर, औदुंबर पालव, दीप्ती माठेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा