You are currently viewing सावरकर समजून घेताना

सावरकर समजून घेताना

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य लेखक हेमंत सांबरे लिखित “सावरकर समजून घेताना” या पुस्तकावर डॉ.लक्ष्मीकांत बाहेगावकर, उपप्राचार्य, सावरकर कॉलेज यांनी केलेले परीक्षण*

” *नव्या दमाच्या अभियंता लेखकाचा यशस्वी प्रयत्न”*

*सावरकर समजून घेताना*

‘ सोबतकार’ ग.वा. बेहेरे सावरकरांबद्दल बोलताना म्हणतात स्वातंत्र्यवीर सावरकर हे रोजच्या रोज वनस्पतीला येणारे फुल नाही ते कधीतरी उमलणारे *ब्रह्मकमळ* आहे. अलीकडच्या काळात सावरकरांवर टीका होत असताना स्वातंत्र्यवीरांच्या समर्थनार्थ नव्या* दमाची अभ्यासू पिढी पुढे येऊन ताठ मानेने याला उत्तर द्यायला तयार झाली आहे. हेमंत सांबरे या तरुण अभियंता लेखकाने* ‘ *सावरकर समजून घेताना’* या पुस्तकाच्या माध्यमातून तात्याराव सावरकरांच्या विविध पैलूंचे दर्शन घडवण्याचा यशस्वी प्रयत्न्न केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे रसायनच असे आहे की शत्रुत्व भावनेतून स्पर्श केला तर हात भाजतो पण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ते रसायन मनात उतरते हे प्रास्ताविकेतील शुभा साठे यांचे विधान नव्याने सावरकर समजून* घेणाऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मदिनी 28 मे रोजी हेमंत सांबरे लिखित ‘सावरकर समजून घेताना’ हे पुस्तक प्रकाशित झाले. सावरकर अभ्यासाक असलेले हेमंत सांबरे यांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन पुस्तक रूपाने आपल्यासमोर आले आहे. *पुस्तकाला सावरकर साहित्याच्या अभ्यासिका लेखिका डॉ. शुभा साठे यांची प्रस्तावना आहे.*

*पुस्तकात एकूण 14 प्रकरणे आहेत.*
पहिल्या प्रकरणापासून शेवटच्या प्रकरणा पर्यंत सावरकरांच्या विविध पैलूवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. सावरकरांना स्वातंत्र्यवीर सावरकर का म्हणावे? हे मांडत असताना सावरकरांना ‘स्वातंत्र्यवीर’ सर्वप्रथम कोण म्हणाले याचा उल्लेख करत प्रभाकर चिटणीस यांचा ‘स्वातंत्र्यवीर कुंडली विचार’ हा लेख, कवी वैशंपायन यांनी सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हटल्याचा उल्लेख आणि मुंबईचे कवी सोपान यांनी ‘गोदातीरस्त स्वातंत्र्यवीरास’ नावाची स्तुती पर कविता लिहिली याचा उल्लेख आहे.
*27 वर्षे बंदिवास भोगणाऱ्या सावरकरांनी भ्रष्ट मार्गाने पैसा कमावला नाही, संपत्ती गोळा केली नाही, स्थापन केलेली* *अभिनव भारत संघटना विसर्जित केली म्हणून त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणावे.**
पुढच्या प्रकरणात दुर्लक्षित अशा अभिनव भारत मंदिराची माहिती देण्यात आली आहे. क्रांतीकारकांची वर्दळ या वास्तूत कशी होती.आबा दरेकर उर्फ गोविंद यांची खोली तीळभांडेश्वर मंदिराचा इतिहास मांडला आहे.सावरकरांच्या कवितेवर प्रकाश टाकताना हिमालयाची उंची आणि समुद्राची खोली एकत्र नांदताना दिसून येते कसे जगावे **सावरकरांची कविता शिकवते हे लेखकाचे म्हणणे* **तंतोतंत खरे आहे.*
सावरकरांच्या खार येथील बंगल्यात सापडलेली सायक्लोस्टाईल मशीनची सर्व माहिती नवीनचआहे. नारायणराव सावरकर कधीकाळी या बंगल्यात राहत होते. इंग्रजांच्या विरुद्ध क्रांतिकारकांची पत्रके छापून ती वितरित करण्यासाठी या मशीनचा वापर करण्यात येत असावा . *इंग्रजांच्या हाती ही मशीन लागू नये म्हणून ती भिंतीत पुरून ठेवण्यात आली नंतर कालांतराने पाडकामात ती सापडली.*
समाज क्रांतिकारक सावरकर मांडताना अंदमानातील सावरकरांनी जेल मधील कैदी आणि इतरांसाठी साक्षरतेचे केलेले कार्य, रत्नागिरीतील सहभोजन, पतीत पावन मंदिराची उभारणी, रोटीबंदी, बेटी बंदी,स्पर्शबंदी,सिंधूबंदी,व्यवसाय* बंदी ,वेदोक्तबंदी, शुद्धीबंदी या बंदीच्या सप्तशृंखला तोडल्या पाहिजेत यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. बुद्धिप्रामान्यवादी सावरकर कसे होते? त्यांचे वैयक्तिक जीवन कसे होते? दिनचर्या काय होती. सावरकरांनी लोकहितला महत्त्व कसे दिले? हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सावरकर प्रणित हिंदू राष्ट्र कसे आहे. सावरकरांची हिंदूंची व्याख्या ,हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व_ आहे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न,विज्ञाननिष्ठ भूमिका कशी होती. सावरकरांनी केलेल्या सशस्त्र क्रांतीमुळे देश स्वतंत्र झाला.’लेखन्या या मोडा आणि बंदूक हाती घ्या’ हा संदेश सावरकरांनी देत असताना देशातील तरुणांना सैन्यांमध्ये भरती होण्याचे आवाहन केले. आज बंदुका कशा चालवायच्या ह्या शिकउ, उद्या वेळ आल्यानंतर बंदुकीची टोके कुणीकडे फिरवायची* हे ठरवू .अशी दूरदृष्टी सावरकरांची होती. सावरकरांना सतत नाकारले गेले याची कारणे देताना ते प्रखर हिंदू संघटक होते,बुद्धी प्रामाण्यवादी होते, अखंड भारताचे पुरस्कर्ते होते, सावरकरांनी हिंदुत्वाची नव्याने मांडणी व नवी व्याख्या केली, त्यांची देशभक्ती खरीनिस्पृह होती या कारणांचा विचार केला आहे.
सावरकर समजून घेताना त्यांच्या अनेक भूमिका लक्षात घेतल्या पाहिजेत.
83 वर्षाचे आयुष्य सावरकरांचे होते.या प्रवासामध्ये त्यांच्या अनेक पैलूंचे दर्शन आपल्याला होते.सावरकर म्हणजे अनेक रहस्यमय व रोमांचकारी प्रसंग,अनपेक्षित घटना यांनी भरलेला एकच आयुष्याचा जीवनपट आहे. एकाच व्यक्तीच्या आयुष्यात किती गोष्टी घडू शकतात. असा व्यक्ती की ज्याच्या एकाच आयुष्यात किती तरी प्रकारच्या भूमिका वाटायला येतात आणि ती प्रत्येक भूमिका तो समरस होऊन जगतो. प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. त्याला उत्तम व शिखरावर नेऊन ठेवतो. असे भव्य दिव्य चरित्र निर्माण केलेला नेता क्वचितच भारतीय इतिहासात सापडेल.
देशभक्तीचे व्रत सावरकरांनी स्वीकारले होते. त्याचे परिणाम भयंकर होणार आहेत त्याची जाणीव त्यांना होती तरी पण त्यांनी या अग्नि कुंडात उडी घेतली. महाकवी, नाटककार, कादंबरीकार,समाज सुधारक,हिंदू संघटक ,निबंधकार,प्रज्ञावंत इतिहासकार,महान क्रांतिकारक असे किती तरी पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आपल्याला पहावयास मिळतात. *सावरकर समजून घेताना सांबरे यांनी अनेक पैलूं उलघडण्याचा प्रयत्न केला आहे.*
*आपल्या मुलाने लेखक व्हावेही ही आईची इच्छा पूर्ण करताना हेमंत सांबरे यांनी सावरकरांवर आरोप करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून केलाआहे.*

*पुस्तकाचे नाव*

*”सावरकर समजून घेताना*”

*लेखक – हेमंत सांबरे*
**पृष्ठ संख्या – ११२*
*किंमत – २००/- ₹*
*सवलत मूल्य – १५०/- ₹*

*खरेदीसाठी व्हॉट्सॲप करून नाव, पत्ता, पिनकोड आणि मोबाईल नंबर द्यावा.*

*संपर्क क्रमांक- 9766183857*

प्रतिक्रिया व्यक्त करा