देवगड तालुक्यातील पडेल विभागातील जवळपास ८० राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश….
देवगड :
तालुक्यातील पडेल विभागातील वाडा मधील सरपंच सौ शितल वाडेकर, दिलीप वाडेकर, गौरव वाडेकर, अशोक पांचाळ, विजय पांचाळ, राजन मांजरेकर यांच्यासह जवळपास ८० राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख संजय पडते व जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या हस्ते शिवबंधन बांधून भगवा झेंडा हाती घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी व्यासपीठावर माजी तालुका प्रमुख ॲड प्रसाद करंदीकर, युवासेना जिल्हाप्रमुख गितेश कडू, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर, संजय आंग्रे, सौ वर्षाताई पवार, उपतालुका प्रमुख सुनील जाधव, विभाग रमा राणे, बापर्डे विभाग प्रमुख विष्णू घाडी, माजी उपसभापती संजय देवरुखकर, युवासेना विभाग प्रमुख फरिद काझी, वैभव मराठे, सुनिल खडपे, ठाकूर देसाई, सरपंच सुनील तेली, उपविभाग प्रमुख चंद्रकांत तानवडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.