*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*पाणी पाणी पाणी…*
जरा पाणी आण ग मला प्यायला..
ताई, जरा पाणी वाढता का?
काय ऊन आहे बाई! पाणी पाणी जीव झाला नुस्ता..
काय बाई आहे? पाणी ही देत नाही प्यायला.
पाणी पाणी काय करतोस रे? जीव चालला का पाण्यावाचून..
धोंडी धोंडी पाणी दे..
जीवाचं पाणी पाणी झालं नुसतं…
पाणी पडनां झालाय् ! काय कराव बा शेतकऱ्यानं?
पाण्या वाचून मासा तडफडतोय् जसा!
पाण्यात राहून माशाशी वैर करतो?
बघ, तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या गंगा यमुना?
मी डोळे वटारताच पाणी आले बघ तिच्या डोळ्यात!
काय आणि किती संभाषणे वाक्प्रचार म्हणी ऐकतो आपण
पाण्या विषयी.. कल्पना करा पाणीच नसते तर ..?
जशी जमिन नसती तर ..? आपण कल्पनाच करू शकत
नाही, त्या प्रमाणे पाण्याशिवाय जीवन फुलूच शकत नाही.
किती ही कसदार माती असो? पाण्याशिवाय अर्थच नाही हो?
म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात. आता आज मी रासेगांवच्या झोपडीत बसून लेख लिहिते आहे. खूप झाडीत
ही झोपडी आहे तरी बसल्या बसल्या दोन लिटर पाणी प्याले
मी?कारण बाहेर प्रचंड ऊन आहे. थंडी पडताच पाणी प्यायची
इच्छाच होत नाही. आणि उन्हात थंडगार पाण्याची लज्जत
काही औरच असते.ग्लासामागून ग्लास आपण रिचवत असतो.
केवढा महान आहे हो निसर्ग ? माणूस जन्माला घातल्यानंतर
त्याला जे जे लागते ते ते बेमालूमपणे त्याने निर्माण करून ठेवले आहे. कोणी बाहेरून आल्यास त्याला आपण आधी पाणी देतो. इथेच पाण्याचे महत्व अधोरेखीत होते.अगदी प्रथम
ऋषीमुनिंच्या वैदिक काळात जेव्हा संस्कृती नुकतीच जन्माला
येऊ पहात होती तेव्हा देखील ऋषीमुनींनी रेणुका व जमदग्नींना
रेवा काठी म्हणजे नर्मदा तीरी पाठवले. संस्कृती जन्माला आल्या त्या नदी काठानेच ! हो पाण्याशिवाय भागणार कसे?
तेच तर जीवन आहे जे कधीच आटत नाही. नदी जरी वर वर
तुम्हाला कोरडी दिसली तरी तुम्ही छोटासा झिरा म्हणजे खड्डा
कोरताच खालून वर पाणी झिरपू लागते व छोटेसे तळे बनते.
व काही वेळाने नितळ पाणी वर येते. विहिरी खोदा, पाणी
लागतेच.त्या मुळे नदी काठी जरी माणूस रहात असला तरी
पूर्वी घरोघर आड असत. आडातूनच दिवसभर बायका पाणी
शेंदून कामे करत असत. राज्यकर्त्यांनीही सार्व. विहिरी खोदून
त्यांना पायऱ्या बांधून जनतेची सोय केलेली असे.
असे हे पाणी अनमोल आहे पण ते एका जागी कधीच थांबत नाही. त्याची सतत वाफ होऊन त्याचे स्थित्यंतर होत असते.
बांधकामाला सिमेंटवरती तुम्ही कितीही पाणी मारा. ते वाफ
होऊन निघून जाते. पाणी एका जागी रहातच नाही.नद्या नाले
समुद्र यांची सतत वाफ होऊन आकाशात पुन्हा त्याचे ढग
बनून पाणी पुन्हा परत येते व पाण्याचे हे चक्र सतत चालू
रहाते.त्या मुळे बरोबर पावसाळ्यात पाणी साठा होऊन धरणे
तुडुंब भरतात व बाराही महिने आपल्याला पाणी मिळते. कशी
योजना आहे पहा निसर्गाची! वाफ होऊन पाणी पुन्हा पुन्हा परत येते व सृष्टीला जीवनदान देते. सारी सृष्टी चराचर
जगते ते पाण्यावरच ना? जमिन पिकते व धनधान्य फळे
मिळतात, व आपण त्यावरच जगतो. अन्न व पाणी माणसाला
जगवतात. नुसत्या पाण्यावरही माणूस खूप दिवस राहू शकतो.
पाण्या शिवाय मात्र माणूस जगणे अवघड आहे. म्हणूनच ते
जीवन आहे.
पाण्याचे एवढे महत्व असतांना देखील त्याच्या वापरा विषयी
मात्र आम्ही अत्यंत बेफिकीर व बेजबाबदार आहोत. त्या बाबतीत आपले वर्तन अतिशय निंद्य असेच आहे.पाणी वापरतांना आपण विचारच करत नाही. वाटेल तसे पाणी आपण सांडतो व नद्या नाल्यांना घाण करून अक्षम्य गुन्हा ही
करतो. आणि त्याची खंत न वाटण्या इतके आपण निर्ढावलो
आहोत. “ना खेद ना खंत” अशी आपली अवस्था आहे आणि
ती अत्यंत भयावह आहे. हे असेच चालत राहिले तर..? काळ
आपल्याला कधी ही क्षमा करणार नाही.अहो, मध्ये एक देश
पाण्याअभावी सोडून द्यावा लागला नि समस्त पब्लिकला स्थलांतर करावे लागले ना? वाचलं असेलच तुम्ही! काही काही शहरांमध्ये ८/८ दिवस नळाला पाणी येत नाही! मग साठवलेल्या पाण्यातून रोगराई पसरणे आलेच ! बायकांना
डोक्यावर हंडे घेऊन मैलमैल जावे लागते व विहिरींनी तळ
गाठलेला असतो. विहिरीत उतरून पाणी भरावे लागते!
पाणी पाणी पाणी.. शोष पडतो पाण्याचा हो? पाणी पाणी
करत लोक जीव सोडतात. काही देशांमध्ये अन्न पाण्याचा
इतका तुटवडा आहे की त्यांची हाडे बघवत नाहीत, रडू कोसळते ती कुपोषित मुले पाहून! म्हणून हा नैसर्गिक स्रोत
आपण अत्यंत जबाबदारीनेच वापरला पाहिजे..
देव न करो.. आपल्याला पाणी पाणी पाणी करत ..
वेळ न येवो..
हे जरी टोकाचे बोलणे असले तरी असे घडणारच नाही अशा
भ्रमात कुणी राहू नये एवढेच सांगते. कालचक्र फार अनाकलनीय आहे, त्याचा फटका केव्हा कुणाला कसा बसेल
सांगता येत नाही, नाही तर सांगलीकरांच्या नाका तोंडात पाणी
गेले असते का? निसर्गाचे संतुलन प्रचंड बिघडले आहे हे गेले काही वर्षे सातत्याने आपण बघतो आहोत. म्हणून पाणी टंचाई
दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करायला हवी.
पण आम्हाला प्रत्येकच काम सरकारनेच(विश्वसनीय नसतांनाही)करायला हवे असते.माणसी एक झाड जोवर
जोपासले जात नाही तोवर ही तूट भरून निघणार नाही.
म्हणून पाणी पाणी पाणी करण्याची वेळ आम्हावर येऊ
नये असे वाटत असेल तर..”लागा कामाला”
पाणी वाचवा, पाणी वाढवा, झाडे लावा.. हा मंत्र जोपासा..
बाय बाय मंडळी…. धन्यवाद
आपलीच,
सुमती पवार नाशिक
(९७६३६९५६४२)
दि: २८ मे २०२३
वेळ: रात्री १०/३२
*संवाद मिडिया*
*🧑🏻🎓प्रवेश..सुरू ! प्रवेश..सुरू ..!! प्रवेश..सुरू ..!!!🧑🏻🎓*
📣 *B. C. A. DEGREE*
*BCA Degree ला ॲडमिशन म्हणजे संगणक क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी.*🧑💻🧑💻
*👉 प्रवेश पात्रता…*
*▪️प्रथम वर्ष बीसीएकरिता: कोणत्याही शाखेची बारावी परीक्षा (गणित किंवा गणिताशिवाय) किमान ४५ टक्के व मागासवर्गीयांसाठी ४० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण*
*▪️थेट द्वितीय वर्ष बीसीएकरिता: डिप्लोमा पदवीका प्रथम श्रेणीत उत्तीर्ण (सिव्हिल इंजिनियर व्यतिरिक्त)*
*▪️मर्यादित प्रवेश उपलब्ध*
*संपर्क:*
*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वुमन्स*
*(एसएनडीटी महिला विद्यालय, मुंबई संलग्न)*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*
*📱 ७९७२९९७५६७, ९४२०२७४११९*
*Advt Link*
https://sanwadmedia.com/98807/
———————————————-