*भारतीय साहित्यिक व सांस्कृतिक मंच जिल्हा कार्याध्यक्षा, अमरावती शिक्षिका, लेखिका, कवयित्री सौ.आरती नागपुरे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*भूक खिश्याची*
गरजांची वाढे भूक
दुष्कृत्याला देई हाक
विघातक वृत्ती जन्मे
संस्कारांची होई राख
होता मूल्यांचे मरण
माणसांचे तुटे बंध
मोहापाई माणूस हा
काळया कमाईत दंग
भ्रष्टाचार फोफावूनी
सत्यालाही गिळू पाही
अराजक वृत्ती जशी
दृष्टतेला जन्म देई
गरजांचा हव्यास हा
काही सुटता सुटेना
श्रीमंतीच्या मोहा पाई
भूक खिशाची मिटेना
सौ. आरती प्रविण नागपुरे
अमरावती