You are currently viewing वारी महिमा

वारी महिमा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य लेखक कवी चंद्रशेखर धर्माधिकारी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वारी महिमा*

 

माझ्या गावातहो आज

पालखीचे आगमन

रांगोळ्यांनी सजले रस्ते

जसा दिवाळीचा सण

 

गावातून वाहे कशी

भक्तीची ही चंद्रभागा

धर्म जात विसरुनी

ह्रदयी विठ्ठल होई जागा

 

घराघरास लाभला

सज्जनांचा सहवास

वारकऱ्यांच्या मुखी

भाकरीचा गोड घास

 

माझ्या गावच्या कुशीत

विसावली अशी वारी

कणाकणात विठ्ठल

अवघी मातीच पंढरी

 

हेचि मागणे विठूराया

जावा काळ तव सेवेत

वारकऱ्यांच्या रुपाने

मज भेटावा भगवंत

 

चंद्रशेखर द. धर्माधिकारी

पुणे©️

प्रतिक्रिया व्यक्त करा