*महाराष्ट्रात सर्व सरकारी व खाजगी हॉस्पीटल यांनी रुग्ण हक्कांची सनद दर्शनी भागात लावण्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यावेत
– महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ता,ॲड धनंजय जुन्नरकर*
राज्यातील सरकारी खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांच्या हक्काची सनद (द चार्टर ऑफ पेशंट राईटस) हि सनद मानवी हक्क आयोग भारत सरकार यांनी दि. १३ जानेवारी २०२० रोजी त्यांच्या वेबसाईट वर प्रकाशीत केली आहे. ही सनद जशीच्या तशी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी स्विकारलेली आहे तसेच सदर सनद सर्व राज्य सरकार यांनी पाठवलेली आहे. तसेच राज्य सरकारनी त्यांच्या आरोग्य व्यवस्थे मार्फत प्रत्येक हॉस्पिटल मध्ये लागू करावी असे निर्देशही केंद्र सरकारने दिलेले आहे. महाविकास आघाडीने देखील तसे आदेश दिले होते होते. परंतु महाराष्ट्रातील बहुतांश तालुक्यातील कोणत्याही हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या रुग्णहक्कांची सनद (द चार्टर ऑफ पेशंट राईटस) दर्शनी भागात लावल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी तसे आदेश काढावेत असे निवेदन महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ता ॲड.धनंजय जुन्नरकर ह्यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री ह्यांना केले आहे.
कोणत्याही पूर्व अटी न लावता व उपचार सुरू करण्याच्या अगोदरच पैशाच्या मागणी न करता पहिल्यांदा पेशंटला सर्वोत्तम, सुरक्षापूर्व व दर्जेदार तसेच तातडीने वैद्यकीय सेवा देवून पहिल्यांदा रूग्णांचा जीव वाचविणे हॉस्पीटल व डॉक्टरांचे कर्तव्य आहे. राज्यघटनेच्या कलम २१ प्रमाणे प्रत्येक भारतीयांना जगण्याचा अधिकार आहे,
तो अधिकार कोणत्याही अपत्कालीक परिस्थीतीत प्रधान्याने सुरक्षीत राहिला
पाहिजे यासाठी रुग्णांच्या हक्काची सनद लावणे अत्यंत गरजेचे आहे. पुरेशी माहिती मिळण्याचा हक्क, आजाराचा प्रकार, त्यांची कारणे तपासण्यांचे तपशील, काळजी, उपचारांचे परिणाम, त्यामुळे होणारी गुंतागुंत आणि अपेक्षित खर्च, रुग्णांच्या नोंदी, केसपेपर, तपासण्यांचे अहवाल आणि सविस्तर बिले मिळण्याचा हक्क, उपचारासाठी माहितीपुर्ण संमतीचा हक्क, रुग्णाने निवडलेल्या डॉक्टरांकडून सेकंड ओपिनियन मागविण्याचा हक्क, उपचारांदरम्यान गोपनीयता, खासगीपणा तसेच मानवी प्रतिष्ठा जपण्याचा हक्क, पुरुष डॉक्टरांकडून महिला रुग्णाची तपासणी होत असताना स्त्री कर्मचारी वा नातेवाईक सोबत असण्याचा हक्क, एचआयव्ही बाधित असल्यास भेदभावरहीत उपचारांचा आणि वागणुकीचा हक्क, पर्यायी उपचारपध्दती निवडण्याचा हक्क हे रुग्णहक्क | सनद (द चार्टर ऑफ पेशंट राईटस) मध्ये असणे अपेक्षित आहे, तरी सदरील रुग्णहक्क सनदी महाराष्ट्राच्या तालुक्यातील सर्व खाजगी व सरकारी हॉस्पीटलने अघ्याप लावलेल्या नसल्याने आपण या रुग्णहक्कांची सनद
(द चार्टर ऑफ पेशंट राईटस) हॉस्पीटलच्या दर्शनी भागात लावण्याचे सर्व सरकारी व खाजगी हॉस्पीटल यांना त्वोरीत आदेश द्यावेत व त्याबाबत उपाय योजना राबवाव्यात., व आदेश निर्गमित करुण त्याची काटेकोर पणे अमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ता ॲड.धनंजय जुन्नरकर ह्यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री ह्यांना केले आहे.
*संवाद मिडिया*
*🧑🏻🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩🎓*
*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*🏭यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏭*
*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *💯 नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक
*उपलब्ध कोर्सेस*👇
🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिंग
🔹 कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
*📖प्रमुख वैशिष्ट्ये📖*
*❇️3 वर्षांचा अभ्यासक्रम📖*
*❇️अनुभवी व तज्ञ प्राध्यापक🕺🏼*
*❇️उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
*❇️उत्तम निकालाची परंपरा🤷♂️*
*❇️नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार*🤝
*❇️💯 नोकरीची हमी👍🏻*
❇️ *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना *50% शासकीय फी सवलत💸*
🆓 *SC/ST* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण🆓*
*🚌बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध*
*आजच आपला प्रवेश निश्चित करा…📝*
*भेट द्या –👇🏻*
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, ता.सावंतवाडी*
*जि. सिंधुदुर्ग*
*www.sybespolytechnic.com*
*संपर्क -*
*☎️02363273535/273456*
*📲मोबा.9404598060*
*आमची प्रवेश केंद्रे -:*
*कुडाळ प्रवेश केंद्र*
माने-जी क्रिएशन, पीएनबी बँकेजवळ, कुडाळ, ता.कुडाळ
9403053303 / 9403163639
*माणगाव प्रवेश केंद्र*
कदम कॉम्प्लेक्स, हायस्कूल रोड, माणगाव तिठा, माणगाव, ता.कुडाळ
9421718850 / 9158510198
*वेंगुर्ला प्रवेश केंद्र*
हायटेक कॉम्प्युटर, जि प शाळा नंबर 3 जवळ, वेंगुर्ला, ता.वेंगुर्ला
9403101880 / 8879433307/ 9964056383
*मळेवाड प्रवेश केंद्र*
श्री गणेश मंदिराजवळ, मळेवाड तिठा, मळेवाड, ता.सावंतवाडी
9422810151 / 9175017071
*दोडामार्ग प्रवेश केंद्र*
शॉप नं.4, टोपले कॉम्प्लेक्स, बॉम्बे टेक्सटाईलच्या मागे, बाजारपेठ दोडामार्ग, ता.दोडामार्ग
9130003477 / 9145705988 / 9405990211
*Advt Link*
https://sanwadmedia.com/98446/
———————————————–