सिंधुुर्गनगरी
कोर्टात चालणारी ई-फायलिंग प्रणाली सुलभ होण्यासाठी बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांचेकडून सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात, जिल्हा बार ओरोस येथे व प्रत्येक तालुका कोर्टाचे ठिकाणी कॉम्प्युटर, स्कॅनर व प्रिंटर हे साहित्य सूपूर्त केलेले आहे. ई-फायलिंग वर काम करणारा सिंधुदुर्ग जिल्हा पहिला ठरेल व ही सर्व मेहनत व गोवा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ऍड संग्राम देसाई यांनी केली आहे अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष विवेक मांडकुळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा तर्फे ई-फायलिंग करीता स्वतंत्र कक्ष आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये व ओरोस जिल्हा न्यायालय येथे सुरू करण्यात येणार असून बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा च्या या उपक्रमाचा शुभारंभ आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून करण्यात येणार आहे. हा उद्घाटन समारंभ जिल्हा न्यायालय ओरोस येथे शनिवार दिनांक 10 जून 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. भारुका , बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे अध्यक्ष मिलिंद पाटील,उपाध्यक्ष संग्राम देसाई, सदस्य जयंत जायभावे, सिंधुदुर्ग जिल्हा बार अध्यक्ष परिमल नाईक व उपाध्यक्ष व अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत .
एआयआर इन्फोटेक मार्फत सर्व वकील व पक्षकारांसाठी इ-फायलिंगची सेवा माफक दरात उपलब्ध करून देण्यात येणार असून एआयआर इन्फोटेक च्या इ-लायब्ररी मधील एआयआर, सीआरएलजे इ. सर्व लॉ जर्नल मधील सायटेशन्स उपलब्ध होणार आहेत.
या कार्यक्रमास ए. आय. आर. समुहाचे चे प्रमुख मंदार चितळे देखील कार्यक्रमास उपस्थित राहून या समारंभामध्ये ई- फायलिंग सेंटर तर्फे पुरविण्यात येणा-या सुविधांची माहिती देणार असून व ई-फायलिंगचे प्रात्यक्षिक देखील दाखविण्यात येणार आहे.
या ई फायलिंग ककक्षाचा शुभारंभ सिंधुदुर्गातून होत आहे. त्याचबरोबर मुंबईत झालेल्या कार्यक्रमांमध्ये या कक्षा संदर्भातील पत्र स्विकारण्याच्या मान प्रातिनिधिक स्वरूपात ज्या पाच जिल्ह्यांना देण्यात आला त्यामध्ये सिंधुदुर्गला ही मान मिळाला होता, हे सर्व महाराष्ट्र व गोवा बारा उपाध्यक्ष आणि सिंधुदुर्ग चे पुत्र वकील संग्राम देसाई यांच्यामुळे शक्य झाले आहे. असेही यावेळी श्री मांडकुलकर यांनी स्पष्ट केले.
या शुभारंभास आपण सर्व वकील बंधू भगिनी यांची उपस्थिती आवशक आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन वकील विवेक मांडकुळकर यांनी केले यावेळी सिंधुदूर्ग जिल्हा बार असोसिएशन च्या उपाध्यक्षा ॲड .नीलिमा सावंत गावडे, सचिव ॲड. यतिश खानोलकर सहसचिव ॲड अक्षय चिंदरकर .कोषाध्यक्ष ॲड गोविंद बांदेकर , राजेश पुळेकर, अविनाश परब, महेश शिंपलरे आदी उपस्थित होते.