You are currently viewing पाण्याची बचत करुन संवर्धन करणे हि आपली प्रत्येकाची जबाबदारी -प्रा.खानोलकर

पाण्याची बचत करुन संवर्धन करणे हि आपली प्रत्येकाची जबाबदारी -प्रा.खानोलकर

वेंगुर्ले

राष्ट्रीय जल मिशन ‘ कॅच दि रेन विषयी जनमाणसात जनजागृती व्हावी यासाठी भारत सरकारच्या युवा कार्यक्रम,क्रीडा मंत्रालय आणि वेताळ प्रतिष्ठान तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले येथे लौकिक सभागृहात नुकतच राष्ट्रीय जल मिशन कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमात प्रमुख अतिथी आणि विशेष मार्गदर्शक म्हणून युवा व्याख्याते प्रा.वैभव खानोलकर हे उपस्थित होते.
तिसरे महायुद्ध झाले तर ते पाण्यासाठी होईल या अटल बिहारी वाजपेयी यांच्या जागतिक पातळीवर संपन्न झालेल्या जागतिक जल परिषदेतील विधानाचा संदर्भ देत प्रा.खानोलकर यांनी जल है तो कल है असे म्हणत पाणी हि राष्ट्रीय संपत्ती आपल्या सगळ्याची पाणी जपुन वापरणे हा सामुहिक जबाबदारी आहे त्यामुळे पाण्याची केवळ बचत करून चालणार नाही तर पाण्याचे योग्य व्यवस्थापन होणे ही तितकेच महत्त्वाचे आहे असे महत्वपूर्ण विचार या व्याख्यानातुन व्यक्त केले.
जल सर्वधन हि केवळ शासनाची जबाबदारी नसुन जलसंवर्धनासाठी शासन स्तरावरून नॅशनल वॉटर मिशन च्या अतंर्गत “पाऊस पकडा” या टॅगलाइनसह “पाऊस जिथे पडतो, जेव्हा तो पकडा” ही मोहीम राज्यांना आणि भागधारकांना योग्य पावसाच्या पाण्याची साठवण संरचना तयार करण्यासाठी प्रेरित करण्याच्या शासनाच्या या उपक्रमात आपण नागरिक म्हणून आपले कर्तव्य बजावणे गरजेचे आहे.
त्यामुळे केवळ पाणी बचत करून चालणार नाही तर त्याचे योग्य संवर्धनासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची शपथ घेऊन पाणी वाचवुया असे आवाहन केले.
या कार्यक्रमात संजय पाटील, सर्पमित्र महेश राऊळ,प्रा.सचिन परूळकर, दशावतार कलावंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात विविध शाळांचे विद्यार्थ्यांनी आणि पालकांचा हि मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला होता

प्रतिक्रिया व्यक्त करा