*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा कोकण मराठी साहित्य परिषद शाखा, मालवणच्या सन्मा. सदस्या लेखिका कवयित्री सौ आदिती मसुरकर लिखित अप्रतिम लेख*
*🌹ओंजळ🌹*
*( ललित लेख )*
*चैतन्यरुपी मूर्ती तुझी*
*डोळे भरुनी पाहते*
*ओंजळीतील पुष्पे*
*तुझ्या चरणी वाहते*
प्राजक्ताच्या फुलांनी भरलेली ओंजळ श्री गणेशाच्या चरणी अर्पण करून ती दोन्ही हाताची ओंजळ उघडून देवासमोर उभी राहिली . डोळे मिटून आर्त विनवणी करत होती .
हे गणेशा तुझी आवडती प्राजक्ताची नाजूक फुले ओंजळीत भरून मी तुझ्या चरणी वाहते. ही रिक्त झालेली माझी ओंजळ तुझ्या कृपा आशीर्वादाने भरून टाक. तुला अभिप्रेत असणारे कार्य करून घे. चुकांना माफ कर .
डोळे मिटून स्तब्ध उभी राहून ती गणेश भक्तीत एकरूप झाली होती. गणपतीची तेजस्वी मूर्ती तिच्या डोळ्यात झळकत होती. जणूकाही मनोमन गणेशाशी तिचा संवादच चालू होता. सभोवती भक्तीमय नाद घुमत होता. काय आश्चर्य !
तिची आर्त पुकार गणेशाने ऐकली .
म्हणतात ना, *देव भावाचा भुकेला!*
लाल रंगाचे जास्वंदीचे फूल तिच्या ओंजळीत पडले. ती भानावर आली. डोळे आनंदाश्रुने भरले. भावपूर्ण श्रध्देने तिने तो गणेशाचा प्रसाद स्विकारला . नम्र होऊन आपला माथा गणेशाच्या चरणावर टेकविला. एक वेगळाच उत्साह तिच्या नसानसांत भिनला होता. बाप्पाच्या आशीर्वादाच्या सुमनांनी तिची ओंजळ भरली होती. त्या पुष्पाचा सुवास अंतरी जपून ठेवण्याचा तिने निर्धार केला.
काही दिवसातच सरकारी शाळेत नोकरी लागल्याचं पत्र तिला मिळालं. आज नोकरीच्या रुपात बाप्पाने तिची ओंजळ भरली होती. तिचे स्वप्न साकार करण्यासाठी तिला मार्ग दाखवण्याचे काम आज गणपती बाप्पाने केले होते. तिने आजवर केलेल्या कष्टांच्या झोळीत यशाची ओंजळ रीती करत ….
शिक्षिका या पदावर ती सरकारी शाळेत रुजू झाली . ज्ञानाने भरलेली ओंजळ घेऊन ती विद्यार्थ्यांसमोर जायची. आपले अध्यापनाचे कार्य मन लावून करत ती आपल्या ओंजळीतील ज्ञानफुले प्रत्येक विद्यार्थ्याच्या ओंजळीत देत होती.
ज्ञानपिपासू विद्यार्थी आपली ओंजळ ज्ञानाने भरून घेऊन प्रगती पथावर चालले होते. नवनवीन ज्ञान ग्रहण करण्यासाठी त्यांच्या बुद्धीची ओंजळ मात्र पसरलेलीच असायची.
भावी पिढीची ही अपार कष्ट करण्याची तयारी पाहून वरून पाहणारा बाप्पा मनोमन खूष होता . आपल्या कृपेचे छत्र त्याने आपल्या या भक्तांवर धरले होते.यशस्वी होण्याचे अनेक मार्ग तो त्यांच्यासाठी खुले करत होता. यशाच्या प्रत्येक मार्गावरील एक एक पुष्प अलगत ओंजळीत घेत या गुणी मुलांनी आपल्या ध्येयाचे शिखर गाठले .
त्याचवेळी बाप्पाने त्यांना जाणीव करून दिली.
*यशाचे शिखर गाठून*
*उंच नभात भरारी घे.*
*जन्मदात्यांना ममतेने*
*खराखुरा आधार दे.*
ज्यांच्यामुळे आपण गगनात भरारी घेऊ शकलो त्या आई वडीलांना कधीही विसरू नको. आई बाबांची काळजी घेत आपली सेवारूपी ओंजळ त्यांच्या चरणावर रीती कर .
ही सेवारुपी ओंजळ जेव्हा आई-बाबा, गुरु, दीन-दुबळे, दुःखी – कष्टी लोकांच्या चरणी रीती होईल , तेव्हाच खऱ्या अर्थाने ईश्वराच्या कृपा दृष्टीने आपली ओंजळ सदा भरलेली राहील. त्यातील सुखद क्षणांच्या पुष्पांचा सुगंध आपल्या सभोवती दरवळेल.
*🖊️© सौ. आदिती धोंडी मसुरकर*
*आजीव सदस्य को म सा प शाखा – मालवण*
👩💻🧑💻👩💻👨💻👩💻👨💻👩💻👨💻🧑💻
*_प्रवेश सुरू.. प्रवेश सुरू… प्रवेश सुरू….._*🏃♀️🏃♂️
*स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर करायची सुवर्णसंधी*
*⚜️महेंद्रा ॲकॅडमी⚜️*
*🔰स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र🔰, सावंतवाडी*
*_🌎सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी चालू केलेली एक विशेष चळवळ_*
*_♻️सिंधुदुर्ग जिल्हा हा 10 वी 12वी च्या परीक्षांच्या निकालाचा विचार करता अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण नंतर ही मुले कुठल्याही स्पर्धा परीक्षांमध्ये का दिसत नाहीत? स्पर्धापरीक्षांमध्ये आपला जिल्हा मागे का पडलाय? या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आले आहे ? महेंद्रा अकॅडमी सावंतवाडी._*
*_♻️आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्हा हा अधिका-यांचा जिल्हा म्हणून नावारुपाला येईल याचे सर्वतोपरी प्रयत्न महेंद्रा अकॅडमी तर्फे केले जातील._*
*🔰⚜️आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस🔰⚜️👇🏻*
*1. 🔰राज्यसेवा , संयुक्त परीक्षा गट – ब ( PSI /STI/ASO) CDPO( महिला व बालविकास अधिकारी) व सर्व प्रकारच्या सरळ सेवा भरती*
*2.🔰पोलीस भरती स्पेशल बॅच – 2023*
*3.🔰 सर्व प्रकारच्या बँकिंग परीक्षा स्पेशल बॅच -2023*
🎉🎊🎊 *( नवीन बॅचेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे)🎉🎊🎊*
*🔰आमच्या अकॅडमीची वैशिष्ट्ये🔰*-:
*📌अनुभवी शिक्षकवर्ग.*
*📌सुसज्ज वाचनालय.📚📚*
*📌अभ्यासाला पुरक आणि शांत वातावरण.*
*🏠निट व स्वच्छ वर्ग.*
*📌पिण्याचा पाण्याची सोय.*
*📌वाचनालयामध्ये प्रवेश घेण्याअगोदर वाचनालय बघायची संधी.*
*📌आकर्षक व उपयोगी पुस्तके वाचनालयामध्ये उपलब्ध.*
*📌अनोखी शिकवण्याची पद्धत*
*_👉आमच्या अकॅडमीला एकदा भेट द्या आणि आपल्याला पडलेल्या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा._*
*_”मित्रहो” महेंद्रा अकॅडमी ही आपल्या जिल्ह्यातील तरुणांमध्ये असलेली उदात्त बुद्धिमत्ता तसेच आपल्या जिल्ह्यातील मुलांमध्ये अभ्यास करण्याची असलेली क्षमता ही संपूर्ण जगाला दाखवून देण्यासाठी चालू केलेली विशेष चळवळ आहे.आपल्या बहुमूल्य वेळेपैकी थोडा वेळ आमच्यासाठी काढा आणि आमच्या अकॅडमीला एकदा नक्की भेट द्या._*
*अधिक माहितीसाठी संपर्क करा*
*📲7350219093*
*📲9022686944*
*जाहिरात लिंक*
———————————————-