*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी त्र्यंबक शं. देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*
🌹🌹🙏🙏 *सुपुत्र शिवबा* 🙏🙏🌹🌹
सह्याद्रीचे प्रपात सुटले सांगत वार्ता जनी
महाराष्ट्राचे सुपुत्र शिवबा बसले सिंहासनी ॥धृ॥
मंगल वाद्ये वाजु लागली , उभी गुढ्या तोरणे
सुवासिनींनी सडे शिंपिले गंधित झाली बने
द्विजगण सगळे गाऊ लागले , नाचु लागल्या दिशा
भूपाळी आळवू लागली , सनई जगदीशा
थिजलेले चैतन्य जागले मरगळलेल्या मनी ॥१॥
ऊठ ऊठ शिवनेरी गा रे बाल शिवाची गाथा
सिंहगडा रे सांग जगाला मृत्युंजय गाथा
खल निर्दालन करण्या भूवर शिवप्रभू आले
पराक्रमी , संयमी , धर्मरत रुप मराठी ल्याले
जरिपटक्यासह भगवा झेंडा म्हणुन फडकला गगनी ॥२॥
कण कण गर्जे मातीचा जय महाराष्ट्र देशा
धन्य जाहल्या गीत शिवाचे गाऊन वेदऋचा
गंगा, गोदा, आशिर्वच दे, मंत्रघोष घुमले
स्वर्ग धरेच्या कानी सांगे रामराज्य आले
सांगत होती उमा शिवाला वार्ता त्या शुभदिनी ॥३॥
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*” गंधगजर “*
कविवर्य त्र्यं. शं. ( बापुसाहेब ) देशमुख .
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩