कणकवली
सत्यशोधक विद्यार्थी संघटना आणि सत्यशोधक शिक्षक सभेच्यावतीने शाळा आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार ८ जून रोजी सकाळी ११.३० वा. प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सत्यशोधक शिक्षक सभेचे जिल्हाध्यक्ष महेश पेडणेकर, सचिव शंकर जाधव तसेच सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अनिकेत तांबे, सचिव निलीमा जाधव. व तालुकाध्यक्ष सुजय जाधव, सचिव दिक्षा कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
*विविध मागण्यांबाबत लक्ष वेधणार!*
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हा बदलीमुळे रिक्त झालेल्या जि. प. शाळांमध्ये तातडीने शिक्षक भरती यावी. अकरावी व करण्यात यावी. बारावीनंतर प्रवेश घेणाऱ्या एससी, एसटी, ओबीसी, एनटी आदी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून सरकारच्या निर्देशानुसार कोणतीही फी घेण्यात येऊ नये, असे आदेश जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांना देण्यात यावेत. तसेच जी महाविद्यालये बेकायदेशीर फी घेतील त्यांच्यावर कारवाई करावी आदी मागण्या केल्या आहेत.