*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार गायक संगीतकार अरुण गांगल लिखित अप्रतिम गीत रचना*
*जागतिक पर्यावरण दिन*
सृष्टीचा रंग चितारी असे श्रीरंग
निसर्ग निर्मित असती सारे रंग।।ध्रु।।
पर्जन्य बरसतो विरहीत रंग
तृप्त करतो धरती खुलवी रंग
भूमित उगवती बहुविध रंग।।1।।
इंद्रधनु दावी क्षणिक सप्तरंग
सुमन एक दिवस जगण्यात दंग
फुलाला मातीचा गंध उधळते रंग।।2।।
करावा माणसाने भूमीशी सत्संग
संगीत कला संस्कृती दावी बहुरंग
स्मरावे सर्वांचे ऋण आनंद तरंग।।3।।
श्री अरुण गांगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.