कुडाळ :
दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरण विषयक पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरणाचा दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. या उद्देशाने बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळ येथे पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती दीपा सुब्रमण्यम या उपस्थित होत्या. यांनी मुलांना पर्यावरण दिनाविषयी चे मार्गदर्शन केले. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सांगितले तसेच ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम विषयी मुलांना समजावले. विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक वापराविषयीचा खेळ घेऊन प्लास्टिक बंदीचे महत्त्व मुलांना समजावून सांगितले.
त्याचप्रमाणे प्रायमरीच्या मुलांनी झाडे लावून पर्यावरण दिन उत्साहात साजरा केला. तसेच हिरव्या रंगाचे कपडे व हिरव्या रंगाचा खाऊ आणला होता. तिसरी ते पाचवीच्या मुलांनी पोस्टर व घोषवाक्य बनवली. सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी इंधन बचत व पर्यावरण जनजागृतीचा संदेश देत सायकल रॅली काढली. यामध्ये एनसीसी सीटीओ नचिकेत देसाई यांनी सायकल रॅलीला मार्गदर्शन केले. तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांनी बायोडायव्हर्सिटी या विषयावर पावरपॉइंट सादरीकरण केले व विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून प्रश्नमंजुषा घेण्यात आली.
याप्रसंगी शाळेचे चेअरमन श्री उमेश गाळवणकर शाळेच्या प्राचार्या सौ. शुभांगी लोकरे व उपप्राचार्या विभा वझे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही सहभाग घेतला व सर्वांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मिशेल फर्नांडिस यांनी केले.