रानबांबुळी / कुडाळ :
सिंधुदुर्ग जिल्हा पारंपरिक शेती मधून उदरनिर्वाह करत होता. मुंबईस्थित चाकरमान्यांच्या मनी ऑर्डरवर अवलंबून असलेला सिंधुदुर्गातील ग्रामीण भाग फलोत्पादन योजनेमुळे आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला. आंबा,काजू बागायती पडीक जमिनीत आज पाहायला मिळतात. या बागायतीत *बांबू लागवड* शेतकऱ्यांना किफायतशीर ठरत आहे.
*मानगा* आणि *भोवर* या बांबूच्या दोन जातींना मोठी मागणी आहे.
*मानगा* जातीचा बांबु द्राक्ष लागवड, डाळिंब, लाठी काठी, आईस्क्रीम, प्लायवूड, कागद बनविण्यासाठी कोकणातून या बांबूला मोठी मागणी आहे. *भोवर* जातीचा बांबूला प्लास्टर, बिल्डिंग सेंटरिंग कामासाठी मागणी आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रानबांबुळी (ता.कुडाळ) येथील संतोष दत्ताराम खोत यांनी नऊ एकर जागेत बांबू लागवड केलीय, काजू आणि आंबा बागायत असेल तर गोल बॉण्ड्री वर बांबू लागवड केल्यास बागेचेही संरक्षण होत.
संतोष खोत यांच्याकडे लागवडीसाठी बांबूचे स्टंप उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी संतोष खोत (9421235916) यांच्याशी संपर्क साधावा…