सावंतवाडी
येथील भाजी विक्रेत्यांची चांगली सोय व्हावी यासाठी सुसज्ज भाजी मंडई उभारण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्या होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. दरम्यान भाजी मंडई इमारत उभारण्यात येणार असल्याने शहरातील होणारी गाड्या पार्किंगची गैरसोय दूर होणार असल्याचेही केसरकर यांनी यावेळी सांगितले. ते सावंतवाडीत आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी केसरकर म्हणाले, जिमखाना मैदान येथे सुसज्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार असून त्यात रमाकांत आचरेकर यांच्या नावाने जिमखान्यावर ड्रेसिंग रूम उभारण्यात येणार आहे. तसेच विविध खेळाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी 5.कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आल्याचेही केसरकर यांनी यावेळी सांगितल. तसेच शहरात विविध विकास कामे होत असल्याने सर्वांचं सहकार्य अपेक्षित असल्याचे केसरकर यांनी यावेळी सांगितल.