हॉटेल व्यवसायिक प्रदीप कडुलकर यांचे निधन…!
कणकवली
मूळ वरवडे येथील व सध्या कलमठ बाजारपेठेतील येथे वास्तव्यास असलेले कणकवली शहरातील व्यवसायिक हॉटेल बासमतीचे मालक प्रदीप शंकर कडुलकर (वय ६३) यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, चार मुली असा परिवार आहे. कणकवली शहरात बासमती हॉटेल च्या माध्यमातून ते सर्व परिचित होते. तर त्यांच्या हातची बिर्याणी देखील प्रसिद्ध होती. कणकवली शहरातील हॉटेल मेजवानी चे मालक तेजस लोकरे यांचे ते सासरे तर बँक ऑफ इंडिया मधील कर्मचारी प्रणाली गोसावी यांचे वडील होत.