वेंगुर्ला
ओरीसा राज्यातील बालासोर बहनागा बाजार स्टेशन जवळ कोरोमंडल एक्स्प्रेस व मालगाडी यांचा भिषण अपघात झाला असून या अपघातात 288 जणांचा मृत्यू झाला आहे आणि एक हजार पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. ही घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावणारी आहे. या रेल्वे अपघातात जीवीत हानी मोठ्याप्रमाणात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने वेंगुर्ला येथे मेणबत्त्या पेटवून मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि जे जखमी झाले आहेत त्यांची प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने प्रार्थना करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, वेंगुर्ला तालुका काँग्रेस अध्यक्ष व वेंगुर्ला नगरपरिषदेचे माजी नगरसेवक विधाता सावंत, वेंगुर्ला शहर अध्यक्ष व वेंगुर्ला नगरपरिषदेचे माजी गटनेते प्रकाश डीचोलकर,माजी नगरसेवक आत्माराम उर्फ दादा सोकटे,संकेत वेंगुर्लेकर, स्वदिप परब, साईश परब इत्यादी उपस्थित होते.