बांदा
शिवराज्याभिषेक दिन सोहळा २०२३ निमित्ताने हिंदू संंघटना डिचोली-गोवा यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत बांदा केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
लहान गटात सर्वज्ञ सुर्यकांत वराडकर (इयत्ता चौथी) याने प्रथम क्रमांक मिळविला तर मोठ्या गटात नैतिक निलेश मोरजकर (इयत्ता सहावी) याने द्वितीय क्रमांक मिळविला.
या स्पर्धेत विविध राज्यातून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून सर्वज्ञ व नैतिक यांनी यश मिळविले. वेशभूषा स्पर्धेसाठी ऐतिहासिक विषय होता. सर्वज्ञ याने छत्रपती संभाजी महाराज यांची तर नैतिक याने बाजीप्रभू देशपांडे यांची वेशभूषा साकारली होती. त्यांच्या यशाने दोघांचेही अभिनंदन होत आहे.