You are currently viewing तू जीवाला लावती घोरं

तू जीवाला लावती घोरं

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*तू जीवाला लावती घोरं*

 

तू नखरेवाली पोरं तू झुमकेवाली पोरं

झुणझुणत पैंजणं तू जीवाला लावती घोरं…

 

तू चाफेकळी नारं तुझं डोळं घारं घारं

तीर मारतीय् नजरेचा जातोय ना आरपार..

 

तुझी ठुम्मक ठुम्मक चालं मोती भरला तुझा भांग

जीव होतोय येडा पिसा तू भेटशील का ग सांग?

 

तुझे दात कुंदकळ्या बटा केसांच्या मोकळ्या

नि पायात साखळ्या गर्व चुरडला गड्या..

 

तू तिलोत्तमा सुंदर पण दिसते बिलंदर

कधी करशील पावन सांग सांग माझे मनमंदिर ..

 

हृदयाचा करते चुरा खिळती तुजवरती नजरा

जरा वळून बघना गडे माझ्या मनीचे सुंदरा…

 

तुझा गजरा दरवळतो गली गली परमाळतो

तू जाता रस्त्याने ग पाय आपसुक थांबतो…

 

येड लावते जीवाला पण गवसं ना ग मला

देतो प्रेमाचा हवाला सुखी ठेविन सुंदरा तुला

सुखी ठेविन सुंदरा तुला ….

 

 

प्रा. सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

दि : ३ जून २०२३

वेळ : सकाळी ८/२

प्रतिक्रिया व्यक्त करा