दहावीचा निकाल ९८.०३ टक्के; १९ शाळांचा शंभर टक्के निकाल…
कणकवली
दहावी परीक्षेत कणकवली तालुक्याचा निकाल ९८.०३ टक्के एवढा लागला. तालुक्यात सेंट उर्सुला हायस्कूल वरवडेचा ऐनेश उदय मालंडकर हा ९९.६० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आला आहे. कणकवली तालुक्यात यंदा १९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तालुक्यात सेंट उर्सुला स्कूलच्या श्रीया देवेंद्र माळवदे हिने ९९ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर याच हायस्कूलच्या यज्ञेश मंगेश लाड याने तसेच एस.एम.हायस्कूलच्या तनया प्रवीण कदम हिने प्रत्येकी ९८.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केले आहेत. याखेरीज एस.एम.च्या श्रावणी शिखरे हिने ९८ टक्के, श्रीस्वरूप देसाई याने ९८ टक्के गुण मिळविले आहेत.
उज्वल यश मिळविलेल्या इतर विद्यार्थ्यांमध्ये आयुष चेतन मालपेकर (९७.४०),साईराज श्रीकृष्ण परब (९७.२०),पारस अनिल परब (९७), शताक्षी संदीप सावंत (९६.४०). कासार्डे माध्यमिक विद्यालयातून ऋतुजा बंडवे (९०.६०), अथर्व भोगटे (९०.२०), रीना सावंत (८९). शेठ म.वि. केसरकर हायस्कूल, वारंगावमधुन आदित्य जाधव (८९.४०) ,पृथ्वीराज नामये (८६), सिद्धी टक्के(८५.६०).
आदर्श विद्यालय करंजे मध्ये
सानिका आर्डेकर ( ९४.८०), दिव्या कोरगावकर ( ८९) , माधुरी मेस्त्री( ८७. ८० ). शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय,खारेपाटणचा सावली हरयाण (९५.४०), संचिता केंगाळे (९५.४०),अर्पिता पाटील (९३.२०),हसरी म्हाडेश्वर(९२.६०)सोहम कोलते (९२.६०). न्यू इंग्लिश स्कुल फोंडाघाटचा पारस आचरेकर (९७),जान्हवी पवार (९६.४०),सर्वेश आडीवरेकर (९४.६०).
सावडाव हायस्कुलचा तन्मय खांदारे (७४.४०),गणपत आचरेकर(७१.६०),साक्षी कुबल(७०.६०).
सरस्वती हायस्कूल नांदगावची भक्ती हडकर (९१), अशफाक साटविलकर (८९.२०), धनंजय म्हसकर (८८.८०). नरडवे इंग्लिश स्कूल मधून विठ्ठल अडुळकर ९४.२०, वैदेही कांदळकर ८९.४०, समृद्धी राणे ८८ आणि कुणाल कदम यांने ही ८८ टक्के गुण पटकावले आहेत यांचा समावेश आहे.
तालुक्यात १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांमध्ये बाल शिवाजी हायस्कूल, आदर्श विद्यालय करंजे, नडगिवे हायस्कूल, हरकुळ बुद्रुक उर्दू हायस्कूल, वारगाव केसरकर हायस्कूल, शेर्पे- कुरंगवणे हायस्कूल, वारगाव केसरकर हायस्कुल, न्यु इंग्लिश बोर्डवे, कुंभवडे शंकर महादेव विद्यालय, बिडवाडी विद्यामंदिर, नाटळ विद्यालय, सावडाव विद्यामंदिर, शिवडाव माध्यमिक विद्यालय, वामनराव महाडीक तळेरे, ल.गो. सामंत, माध्यमिक विद्यामंदिर हरकुळ खुर्द, न्यू इंग्लिश स्कूल नरडवे, कासार्डे हायस्कुल, माद्यमिक विद्यामंदिर कनेडी आणि खारेपाटण हायस्कुल आदींचा समावेश आहे.
इतर माध्यमिक शाळांच्या निकालामध्ये कणकवली विद्यामंदिर हायस्कूलचा ९५.४२, एस.एम.हायस्कूल ९५.९०, फोंडाघाट हायस्कूल ९८.४२, न्यू इंग्लिश कळसुली ९८.२७, नांदगाव सरस्वती ९८.४८, करूळ हायस्कुल ९८.४१, आयडियल इंग्लिश वरवडे ९८.५०, विद्यामंदिर लोरे – वाघेरी ८५, सेंन्टउत्सुर्ला वरवडे ९९.९ आणि घोणसरी विद्यामंदिरचा ८८.६३ टक्के निकाल लागला आहे.