You are currently viewing आरोंदा हायस्कूल दहावीचा निकाल १००%

आरोंदा हायस्कूल दहावीचा निकाल १००%

पार्थ केरकर ९४.६०% गुणांसह प्रथम

 

सावंतवाडी :

 

आरोंदा हायस्कूल आरोंदाचा दहावी परीक्षेचा २०२२-२३ चा वार्षिक निकाल १००% लागला आहे.

यात प्रथम क्रमांक पार्थ त्रिंबक केरकर ९४.६०%, द्वितीय क्रमांक विशाल शरद शेटकर ९१.२०%, तृतीय क्रमांक सगुण अनिल शेटकर आणि मिताली संतोष मातोंडकर (विभागून) ८४.००% यांनी गुण प्राप्त झाले आहे.

या एस एस सी परीक्षेस एकूण ३० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेत सुयश संपादन केले असून प्रशालेचा निकाल १००% लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सिद्धार्थ गोपाळ तांबे, संस्था अध्यक्ष गोपाळराव नाईक, सचिव भाई देऊलकर व शालेय समिती यांनी अभिनंदन केले आहे. ग्रामस्थांकडूनही अभिनंदनाचे संदेश येत आहेत, असे प्रशालेचे मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा