You are currently viewing गाळ काढताना मोती तलावाच्या दलदलीत एकजण रुतला

गाळ काढताना मोती तलावाच्या दलदलीत एकजण रुतला

अथक प्रयत्नाने काढले बाहेर

सावंतवाडी

येथील मोती तलावाच्या गाळ काढण्याचे काम सुरु असतानाच या दलदलीत एक युवक रुतल्याचा प्रकार घडला आहे. राजवाड्याच्या समोरील भागात भिंत बांधण्याचे काम सुरु आहे. याच भागात तो चालत जात असताना तो दलदलीत रुतला. सिद्धाप्पा सनतन्नाप्पा मीजी (३५, रा. गरजे मीनल बेळगांव, सध्या रा. सावंतवाडी ) असे त्याचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हा खळबळजनक प्रकार घडला. त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर तो सुखरूप बाहेर आला.

दरम्यान, काही कालावधीनंतर त्याने स्वतः उलट्या दिशेने हात पाय मारत तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. अखेर अर्ध्या तासानंतर त्याच्या प्रयत्नांना यश आले व तो सुखरुपपणे बाहेर पडला. तो बाहेर पडताच उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
यावेळी उपस्थित माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी त्या युवकाच्या धाडसाचे कौतुक केले. तर उपस्थितांनी त्याच्या या जिद्दीला सॅलूट केले. अक्षरशः मरणाच्या दारातूनच तो परत फिरला. यावेळी उपस्थित नागरिकांनी जिवन मरणाचा खेळ याची देही याची डोळा अनुभवला. कारण तो आणखी थोडा पुढे गेला असता तर पूर्णपणे रुतून त्याच्या जीवावर बेतले असते.
यावेळी वाहतूक पोलीस राजा राणे, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, सुनील प्रभू केळूसकर यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी व नागरीक या ठिकाणी उपस्थित होते. तर बघ्यांचीही मोठी गर्दी जमली होती. या प्रकारानंतर या युवकाचा जणू पूनर्जन्मच झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु होती.
यावेळी आपण आज आईला भेटण्यासाठी बेळगाव येथे जाण्यासाठी गोठोस येथून सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सावंतवाडीच्या दिशेने येण्यासाठी एसटी बसने निघालो या ठिकाणी पोचल्यानंतर बेळगावला जाणारी बस एक वाजता होती त्यामुळे आपण त्या ठिकाणी बसून बसून कंटाळलो त्यामुळे शहरात फिरत असताना मोती तलाव परिसरात आलो असता त्या ठिकाणी तलाव सुकलेला दिसला त्यामुळे आपण लघु शंका करिता त्या तलावात उतरलो आणि त्यानंतर आपण पुढे पुढे जात असताना आपला पाय त्या चिखलात रुतला असे त्यांनी सावंतवाडी पोलिसांना सांगितले त्यानंतर खात्री करून त्याला त्यांच्या नातेवाईकांना बोलावून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा