You are currently viewing राज्ञी वूमन वेलफेअर संस्थेचा नाविन्यपूर्ण उपक्रम…

राज्ञी वूमन वेलफेअर संस्थेचा नाविन्यपूर्ण उपक्रम…

*फांदी तोडणार नाही अशी शपथ महिला घेणार….*

 

*परंपरेला आधुनिकतेचा ‘साज’..*

 

हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो.

सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे’, अशी प्रार्थना करतात.

पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे.

भारतीय संस्कृती ही जीवनात नंदनवन फुलवायला, चराचर सृष्टीवर प्रेम करायला शिकविते. सण उत्सव हे तर आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य.वडाची सामुदायिक पूजा करून, फांद्या तोडून घरी करायची पूजा करण्याची रीत मोडून काढायची आहे.

“ती वसुंधरा मी वसुंधरा” या संकल्पनेवर आधारित राज्ञी वुमन वेल्फेअर असोसिएशन पर्यावरणाच्या रक्षणासाठी एकत्रित येऊन विविध उपक्रम राबवत असते. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही एकमेकींना भारतीय वृक्षांची माहिती देणारे वृक्ष पंचांग पुस्तक रुपी वाण देऊन सर्व राज्ञी सभासद वटपौर्णिमा साजरी करणार आहेत.वाचनसंस्कृतीला खऱ्या अर्थाने खतपाणी घातले जावे यासाठी हा अभिनव उपक्रम• आपली संस्कृती प्रत्येक सणाला निसर्गातील पशुपक्षी, वृक्ष, वनस्पतींशी मैत्री करायला शिकवले. आपल्या प्रत्येक सणाला जसे धार्मिक अधिष्ठान आहे, त्याहीपेक्षा त्यामागील शास्त्रीय आणि वैज्ञानिक महत्त्व सर्वाधिक आहे. वृक्षपूजन करून वृक्षसंवर्धनाचा वसा घेऊन , वृक्षतोड करणार नाही.. फांदी तोडून त्याची पूजा करणार नाही… अशी शपथ घेऊन, कोणत्याही आनंदाच्या, उत्सवाच्या क्षणी वृक्षारोपण करून त्याचे जतन करू! आजची स्त्री खंबीर आहेच..स्त्री मुळातच करारी असते. स्वत:पेक्षा इतरांसाठी जगणारी असते. प्रत्येक नात्यातला प्राण जपणारी असते. म्हणून केवळ आजचा नाही तर सारेच दिवस तिच्या विविधांगी रूपांचा गौरव करणारा ठरावा.. प्रत्येक आधुनिक सावित्रीचा सन्मान व्हावा.. दृष्टिकोन बदला.. जग बदलेल..

प्रतिक्रिया व्यक्त करा