You are currently viewing हिंमत असेल तर टोल वसुली करून दाखवाच

हिंमत असेल तर टोल वसुली करून दाखवाच

ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे हायवे प्रशासनाला आव्हान

कणकवली

सिंधुदुर्गात 1 जून पासून टोल वसुली सुरु करणार अशा बातम्या ऐकायला मिळत आहेत मात्र टोल वसुलीला आमचा ठाम विरोध आहे. एम.एच. 07 पासिंग वाहनांना टोलमाफी मिळालीच पाहिजे. टोल वसुली सुरू झाल्यास त्याचा नाहक भुर्दंड जिल्हयातील जनतेला सहन करावा लागणार आहे. टोलमाफीसाठी जिल्हा टोलमुक्त कृती समिती प्रयत्न करत आहे पण त्याचबरोबर जिल्हावासियांनीही टोल भरण्यास ठाम विरोध केला पाहिजे. जर बळजबरीने टोल वसुलीचा प्रयत्न झाला तर तो हाणून पाडला जाईल. खा. विनायक राऊत व आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना स्टाईलने या अन्यायाविरुद्ध आम्ही लढणार आहोत. हिंमत असेल तर टोल वसुली करून दाखवाच असे आव्हान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी हायवे प्रशासनास दिले.

येथील विजय भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संदेश पारकर म्हणाले, महामार्ग चौपदरीकरणासाठी सिंधुदुर्गवासियांनी सर्वतोपरी सहकार्य केले. अनेकांनी आपल्या जमिनी यासाठी दिल्या मात्र अनेक जमीन मालकांना संपादनाचे पैसे मिळालेले नाहीत. अद्यापही महामार्गाचे 20 टक्के काम अपूर्ण आहे. असे असताना टोल वसुलीचा घाट घातला जात आहे. टोलनाक्यामुळे जिल्हयाचे विभाजन होणार आहे. जिल्हा मुख्यालय, रुग्णालय, पोलिस मुख्यालय अशा विविध ठिकाणी जाण्याकरिता कणकवली, वैभववाडी, मालवण, देवगड या तालुक्यातील जनतेला दरदिवशी 100 ते 190 रुपये टोल भरावा लागणार आहे आणि तो अन्यायकारक आहे. एमएच07 पासिंगच्या वाहनांना टोलमुक्तीसाठी आ. नाईक, खा. राऊत यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे जिल्हावासियांना टोलमाफी मिळालीच पाहिजे हि आमची भूमिका आहे. टोल वसुलीचे आर्थिक गणित पाहता दरदिवशी या टोलनाक्यावरून 7 ते 7.50 लाख रु. वसुलीचे टार्गेट आहे. मात्र दरदिवशी 11 ते 11.50 लाख वसुली होणार आहे. या वरच्या पैशांची वाटणी सत्ताधारी आणि ठेकेदारांमध्ये होणार आहे असा आरोप संदेश पारकर यांनी केला.

ते म्हणाले हायवेची आज अनेक कामे अपूर्ण आहेत. कणकवली शहरातील ड्रेनेज सिस्टिम अपूर्ण आहे. त्या पाण्याचे निचरा होण्याचे नियोजन नाही, सांडपाण्याचे नाले उघडे असल्याने दुर्गंधी येते. कणकवलीसह अनेक पुलांच्याखाली पावसाळ्यात पाणी वाहन चालकांच्या

प्रतिक्रिया व्यक्त करा