श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना सागरी पर्यटना शिवाय मनोरंजनासाठी रात्रीच्या वेळी करमणुकिचे माध्यम उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यात नऊ ठिकाणी लाईट आणि साउंड शो प्रकल्प निधी प्राप्त होण्यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे पर्यटन संचानालय नवी मुंबई यांच्याकडे मागणी केली असून त्यास पर्यटन संचनालय ने सकारात्मक प्रतिसाद दिला असुन यामध्ये विजयदुर्ग किल्ला,पवनचक्की गार्डन देवगड ,धामापूर तलाव,तारकर्ली बंदर जेटी कर्ली खाडीत,मोती तलाव सावंतवाडी,रामेश्वर तलाव वेंगुर्ला,दाभाचीवाडी तलाव सिंधुदुर्गनगरी,गडनदी कणकवली,लक्ष्मी नारायण मंदिर तलाव वालावल कुडाळ यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघाने पर्यटन संचानालय यांस प्रस्ताव दिला असून यासाठी सदर प्रकल्पास निधि प्राप्त झाल्यास स्थानिक भागातिल गार्डन,तलाव, किल्ले,मंदिर पर्यटन स्थळे विकसित होण्यास मदत होउन जिल्हयातील पर्यटन व्यवसायात वाढ होउन रोजगार निर्मिती होइल असा विश्वास महासंघास आहे अशी माहिति श्री विष्णु मोंडकर अध्यक्ष,पर्यटन व्यावसायिक महासंघ यानी दिली आहे.