कोनशी विनयभंग प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी – अर्चना घारे परब यांचे रूपालीताई चाकणकर यांना निवेदन सादर
सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील कोनशी गावात घडलेल्या निंदनीय प्रकाराबाबत सर्वत्र निषेध केला जात असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोंकण महिला विभागीय अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी यात लक्ष देत या प्रकरणी आरोपीला जामीन न मिळता जास्तीत जास्त शिक्षा मिळावी अशी विनंती निवेदनाद्वारे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर यांच्याकडे केली आहे. त्वरीत रुपाली ताई यांनीही अधीक्षक अगरवाल यांच्याशी फोन द्वारे चर्चा करत प्रकरणात योग्य ती कारवाई करावी . या प्रकरणी लक्ष घालत आरोपीला जामीन मंजूर न होता कठोर शिक्षा झालीच पाहिजे यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.
काही दिवसापूर्वीच कोनशी गावात लाजिरवाणी घटना घडली एका युवतीवर कोनशितीलच बाबलो शंकर वरक याने एकटी गाठून त्याचा विनयभंग केला आणि त्यास त्या युवतीने प्रतिकार केला म्हणून त्याचा गळा दाबून ठार करण्याचाही प्रयत्न केला यातुन त्या युवतीने कशीबशी आपली सुटका करुन घेतली मात्र यात ती अत्यावस्थ झाल्याने अत्यवस्थ युवतीला त्वरीत दवाखान्यात नेल्याने तिचे प्राण वाचले मात्र अशा घाणेरड्या प्रवृत्तीला लगाम लागावा प्रवृत्ती पुनः वाढू नये यासाठी आरोपीला कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. यासाठी महिला ग्रामस्थांच्या विनंतीचे निवेदन अर्चना घारे परब यांनी दीले.