रावजी यादव – जिल्हाध्यक्ष दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया
सिंधुदुर्ग
वेंगुर्ला पंचायत समिती येथे कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेले न्हानू जगन्नाथ सरमळकर हे नवबौद्ध असल्यामुळेच जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाकडून विशेषतः जिल्हा परिषदेचे सिईओ बदलले की जिल्हा परिषदेचे नियम बदलतात ?. याचाच एक अनुभव म्हणून श्री सरमळकर यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवल्यामुळे मी रावजी गंगाराम यादव जिल्हाध्यक्ष दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा शाखा सिंधुदुर्ग च्यावतीने आणि जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा सिंधुदुर्ग च्यावतीने जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर कार्यालयीन वेळेमध्ये पदोन्नती आदेश मिळेपर्यंत घंटानाद आंदोलन सुरू केले आहे. आजचा दुसरा दिवस उजाडला आहे. आताच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्षा मा.नाईक मॅडम, ओरोस जिल्हा परिषद मतदार संघाचे अंकुश जाधव, जिल्हा परिषदेचे आर्थिक सल्लागार प्रभारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी मा. मदन भिसे यांनी भेट देऊन सकारात्मक चर्चा करून अभ्यास करून संध्याकाळपर्यंत न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो म्हणून सांगितले