You are currently viewing कथा स्वातंत्र्यवीराची

कथा स्वातंत्र्यवीराची

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*कथा स्वातंत्र्यवीराची…

स्वातंत्र्य मिळाले,नव्हते सोपे वीर किती लढले
छाती वरती गोळ्या झेलत धरेवरी पडले
वीर बहादूर पिढी एक ती फासावर गेली
इतिहासी ही पुरती त्यांची नोंद नाही झाली…

कोलू ओढत नारळ सोलत हात पहा सोलले
आज पाहूनी फोटो त्यांचे काळीज पहा फाटले
लंडन येथून वय कोवळे चालविली क्रांती
संसारावर फिरला नांगर फिटली पुरती भ्रांती…

इंग्रज टपले काळेपाणी दोन जन्मठेप
अकरा वर्षे अरे बापरे एक क्षण एक एक
देश प्रेम ते नसानसातून शिकविले कैदी
भिंती रंगल्या कवितांनी त्या शिघ्र अशी बुद्धी…

“कमला” जन्मले कोठडीत हो असीम असे धैर्य
पाठीवरती अमानुष ते ब्रिटिशांचे क्रौर्य
जखडलेला देह शृखंला काचती अविरत
तरी न झाले सत्ते पुढती देशभक्त नत …

कदर न झाली देशभक्तीची लुटले घरदार
परागंदा ते झाले घरटे असह्य ते वार
तरी निर्मिती साहित्याची अजोड ती झाली
सरस्वतीच्या वरदानाला चढली पहा लाली…

होणार कधी ना असे भक्त हो सोनेरी पान
वीर बहादूर होते सारे देशाची शान
नमन करू या चरणी माथा ठेऊ विरांच्या
उजळून टाकू कथा तयांच्या श्रेष्ठ देशभक्तांच्या…

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २६ मे २०२३
वेळ : रात्री ९/४१

 

*ऑफर… ऑफर….. ऑफर….💃💃*

*_कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी पार्क गृह प्रकल्पात ग्राहकांना मिळणार ” ऑफर”…_*

*_१६ लाखात १ बीएचके, तर २७ लाखात २ बीएचके फ्लॅट; दुकान गाळा फक्त १० लाखात…_*
ऑफर*

*🥳पुन्हा एकदा कुडाळ शहरात १६ लाखात फ्लॅट घेण्याची संधी…!💃*

*_🥰आता आमची नवी ओळख “छत्रपती शिवाजी पार्क”…🥰_*

*ग्राहकांच्या उत्स्फूर्त😍 प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो🤩 आहोत…! खास *दसरा🎊 ऑफर…!😍🥳💃*

*मंदी नही…! 😍ये संधी है…!🤩*

*_🏡 छत्रपती शिवाजी पार्क🌴_*
*_🌴गृहप्रकल्प-कुडाळ🏡_*

*👉 घेऊन आले आहेत…!स्मार्टसिटीच्या 🛣️ वाटेवर असलेल्या कुडाळात मध्यवर्ती भागात तयार ताबा 1BHK फ्लॅट फक्त १६ लाखात, 2 BHK फ्लॅट फक्त २७ लाखात तोही GST सह, तर १० लाखात मिळावा दुकान गाळा…!*

👉 *_पहिल्या पाच ग्राहकांना ही संधी…😍🥳🤩_*

*आठ बिल्डिंगच्या🏬 भव्य-दिव्य गृह प्रकल्पा 🏡 सोबत १५ हजार स्क्वेअर फूट गार्डन🏕️,गणेश मंदिर🛕,स्विमिंग पूल🗾,क्लब हाउस🏸,जिम 💪आणि प्रशस्त पार्किंगची🚘 सुविधा…!*💃

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५० ची मेगा टाऊनशिप…🏬*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून चालत फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर…🚆*
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🛑 मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

*🏡 आमचा पत्ता:- साईट शिवाजी पार्क,सत्कार हॉटेल रोड,जुना बस स्टँड समोर,कुडाळ*

*📲 संपर्क :- **९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१*
*९४०४७५१५००*
_______________________

प्रतिक्रिया व्यक्त करा