You are currently viewing चालता चालता

चालता चालता

*मनस्पर्शी साहित्य परिवारच्या सदस्या लेखिका कवयित्री सौ.माया कारगिरवार लिखित अप्रतिम स्फुटलेखन*

*“चालता चालता “*
********************
चालता चालता खुप दूर निघून आले. वाटलं होतं वाट खुप चांगलीच असेल शेवटपर्यंत .चालण्याच्या प्रवासात भेटले ….खाचाखळगे,वाकडे वळण,घाट,वळणावळणाचा रस्ता ……पण चालत राहिले …..एक दिवस …एका थांब्यावर थांबावंसं वाटलं …..थोडी विश्रांती घ्यावी असंही वाटलं …..पण हिरवळीची वाट चालायचे स्वप्न अजून अपूर्णच होते ….ज्या वाटेवरनं जायचे आहे ती वाटहिरव्यागार मऊशार गवताची असावी. ..वाटेच्या बाजूंनी गर्द झाडांची सावली असावी ….पावलांना ठेच लागलीच तर त्या वृक्षाच्या सावलीत जरा वेळ बसता येईल…असा एक विचार मनात यायचा…पण मन चंचल असते ना ..! कधी चांगले सांगते तर कधी भय ही दाखवते ……पुन्हा चालायला सुरूवात केली ..….वाट देखील पथदर्शक असते ….थोडे पुढे गेल्यावर हवी तशी हिरवळीची वाट दृष्टीपथास पडली ….आणि अतिशय आनंद झाला मनाला …..वाट खुपसुंदर मखमली दिसत होती …….याच वाटेने जायचं असं ठरलं ….दूरवर एक मंदिर दिसत होते. …आत एक दिवा मिणमिणतांना दिसत होता…..चालणं सुरू केलं. …पावलांना त्या हिरवळीचा स्पर्श होताच सुखद आनंद मिळत होता…..खुप सुरेख गवताच्या पातीवरून पावलं पडत होती ….पण मधेच काही तरी टोचायचं पावलांना ……डोळे फाडून बघीतले तरी काही दिसायचं नाही …..पण परत पुढे काही अंतर ……परत ते टोचणं जाणवायचं ….पायात सपाता होत्या सुरक्षेसाठी …..मग काय बरं टोचत असेल ? निरखून बघीतलं …..शोध घेतला…मग लक्षात आलं …अरे हा तर आपल्याच सपात्याचा नोंकदार खिळा…..!आपलेच आपल्याला टोचतेय …..काढून फेकला असता तर चालणं मुश्कील झालं असते…..वाट तर हवी तीच मिळाली होती…आता माघार नाही असे म्हणून तो खिळा जरा बाजूला केला ….आणि पुढे चालत गेले …. मंदिराजवळ पोहचले ….आंत प्रवेश केला….मंद पण तेजस्वी दिवा तेवत होता….त्याच्या प्रकाशात मनाला खुप शांत वाटलं ….मनाची खात्री पटली …हिच ती जागा …..आपल्याला इथेच यायचं होतं …..त्या तेजोवलयात एकदम प्रसन्न आणि नवीन उर्जेने भारलेले वातावरण जाणवले …जसे हवे होते अगदी तसेच ……मग निश्चय केला ….हेच आपले ध्येय …..चालण्याच्या प्रवासाचा हाच तो शेवटचा टप्पा ….आता इथेच थांबायचं ….मंदिरातील दिव्याच्या तेजोवलयात आता स्वतःला प्रकाशमान करायचं ….दिव्याची ज्योतही जराशी मोठी होत मंद स्मित करत आहे असे वाटले …..मनाला कौल मिळाला. …शांतीचा ….समाधानाचा. …पावलं थकलेली नव्हतीच …….मन थकलेलं होतं …..त्याला उर्जा मिळाली दिव्यप्रकाशात …..नव्याने जगण्याची …….!!

सौ. माया कारगिरवार

 

🎋🎋🌾🌾🌴🌴🌱🌱🎋🎋🌾

*_शेतकरी, कष्टकरी बांधवांसाठी एक छोटीशी मदत_*

*_🥭🌴आंबा, नारळ, सुपारी,आणि काजू साठी अत्यंत गरजेची असणारी उत्पादने_*

*🎋🌴🌾 Maharashtra agro fertilizer and chemicals* 🎋🌴🌾
*kolhapur*

*_👉डायरेक्ट फॅक्टरी दरांमध्ये, उपलब्ध._*
*_👉मधल्या कुठल्याच मेडीयटरचा समावेश नसल्यामुळे कमी दरांमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे सेंद्रीय खत उपलब्ध_*
*_👉 कल्पवृक्ष आणि निंबोळी पावडर संतुलन ऑर्डर नुसार पोहच करण्याची व्यवस्था_*

*🔹जमिनीच्या सुपीकते बरोबरच उत्पन्नात देखील भरघोस वाढ*

*🔸पिकांची उत्तम वाढ*
*🔹 रोग प्रतिकारक शक्ती वाढते*
*🔸जमिनीचा सामू समान ठेवण्यास मदत*
*🔹 पानांचा व फळांचा आकार वाढतो*
*🔸फळे मोठी होणे*
*🔹प्रकाश संश्र्लेशन कार्य वाढवते.*
*🔸निरोगी आणि विषमुक्त पिके*

*👉आजच संपर्क करा*

*Maharashta agro fertilizer and chemicals.kolhapur.*

*📲9823857786*
*📲8208657954*

*Advt web link 👇*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा