सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय नेतृत्वात नारायण राणे कुटुंबियांना दानशूर म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील कित्येक गोरगरिबांना त्यांच्या आजारपणात, हलाखीच्या काळात जगण्याची उमेद राणे कुटुंबियांच्या दातृत्वाने नेहमीच जिवंत ठेवली आहे. कित्येक महिने इलाजाविना असणाऱ्या, परिस्थिती समोर हतबल झालेल्या अनेकांना राणे कुटुंबीयांनी मानसिक, आर्थिक आधार देत खंबीरपणे उभे केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेकांसाठी राणे कुटुंबीय देवासमान आहेत.
राणे कुटुंबाच्या दातृत्वाचा असाच एक प्रसंग विजयदुर्ग परिसरात दिसून आला. विजयदुर्ग येथील सामाजिक कार्यकर्ते, सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे अलीचाचा म्हणजे अलिमिया धोपावकर हे काही दिवस अगोदर खूप आजारी होते. ही गोष्ट जि. प. चे माजी उपाध्यक्ष व भाजपाचे जिल्हा सचिव आणि या भागातील नेते आरिफ बगदादी यांच्या कानावर गेली. आरिफ बगदादी यांनी लागलीच ही बाब आम.नितेश राणे यांच्या कानावर घातली. नितेश राणे यांनी मुंबईतील स्वाभिमानाचे एनजीओ चालवणारे जावेद खान यांना तात्काळ लक्ष घालण्यास सांगितले. जावेद खान यांनी आरिफ बगदादी यांना फोन करून अलिमिया धोपावकर यांना मुंबईत पाठवायला सांगितले.
मुंबईत गेल्याबरोबर जावेद खान यांनी अलीचाचा यांना नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू झाले. नानावटी मध्ये त्यांचे ऑपरेशन झाले व चाचांच्या मणक्यातील गाठ काढण्यात आली. एकही पैसा खर्च न घेता त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आज त्यांची प्रकृती चांगली सुधारत आहे. राणे कुटुंबियांकडून केलेल्या अमूल्य मदतीसाठी अलीमिया धोपावकर यांच्या कुटुंबाने कोकणचे नेते खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे, जावेद खान, आणि विजयदुर्ग भागातील लोकप्रिय नेते आरिफ बगदादी यांचे आभार मानत ऋण व्यक्त केलं.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब लोकांना मदत करण्याचे गोरगरिबांना लाखो रुपये खर्च करण्याचे दातृत्व हे फक्त राणे कुटुंबाकडे आहे हे पुन्हा एकदा जिल्हावासीयांना दिसून आले आहे. राणे कुटुंबाच्या मदतीसाठी आणि राणेंच्या शब्दावर अली चाचा यांना मुंबईत निस्वार्थी मदत करणाऱ्या जावेद खान आणि फायमीदा मॅडम यांचे देखील अलीमिया धोपावकर कुटुंबाने आभार मानत अल्लामिया कडे त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे.