आ. नितेश राणे यांचीही जिल्हा शल्य चिकित्सकांशी चर्चा
देवगड :
देवगड ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेंटर बंद असल्याने व वेळोवेळी तारखा देऊनही ते सुरू होत नसल्याने माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांच्या नेतृत्वाखाली डायलिसिस रुग्णांच्या नातेवाईकांनी देवगड ग्रामीण रुग्णालयात उपोषणाला सुरुवात केली.
अखेर कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती करून डायलिसिस सेंटर सुरू करीत असल्याचे पत्र वैद्यकीय अधीक्षक संजय विटकर यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी उपोषण स्थळी भाजपा पदाधिकारी योगेश पाटकर, दयानंद पाटील, चंद्रकांत कावले, नरेश डांबरी शैलेश लोके रुग्णाचे नातेवाईक पराडकर उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी पहा / वाचा
मान्सून बाबत महत्वाची अपडेट
देवगड ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेंटर बंद झाल्याने अनेक रुग्णांना डायलिसिस घेणे शक्य होत नव्हते बऱ्याच वेळा खाजगी डायलिसिस सेंटर मध्ये प्रतीक्षा करावी लागत होती शिवाय खर्चामुळे ते हैराण झाले होते योगेश चांदोस्कर यांनी यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक संजय विटकर यांची भेट घेतली व समस्या मांडली मात्र त्यांनी दिलेल्या वेळातही डायलिसिस सेंटर सुरू होऊ शकले नाही अखेर योगेश चांदोस्कर यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आमदार नितेश राणे यांनीही याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांशी चर्चा केली अखेर प्रतिनियुक्तीने कर्मचारी देत असल्याचे पत्र वैद्यकीय अधीक्षक संजय विटकर यांनी देताच हे उपोषण मागे घेण्यात आले.