You are currently viewing एसटी कामगार सेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी अनुप नाईक,जिल्हा सचिव पदी भगवान धुरी

एसटी कामगार सेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी अनुप नाईक,जिल्हा सचिव पदी भगवान धुरी

*एसटी कामगार सेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी अनुप नाईक,जिल्हा सचिव पदी भगवान धुरी*

*खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत एसटी कामगार सेनेची बैठक संपन्न*

*एसटी कर्मचाऱ्यांच्या व नागरिकांच्या प्रश्नांबाबत खा. विनायक राऊत यांनी विभाग नियंत्रकांना केल्या सूचना*

महाराष्ट्र एसटी कामगार सेना सिंधुदुर्गची महत्वाची बैठक मंगळवारी खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,शिवसेना जिल्हाप्रमुख सतिश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली विजय भवन येथे संपन्न झाली. महाराष्ट्र एसटी कामगार सेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी अनुप नाईक ,जिल्हा सचिव पदी भगवान धुरी (आबा धुरी ) यांची निवड झाल्याने त्यांना निवड पत्रे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या व नागरिकांच्या प्रश्नांबाबत खासदार विनायक राऊत यांनी एस टी कामगार सेना पदाधिकाऱ्यांसमवेत एसटीचे विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांच्याशी बैठक घेतली.

सध्या अनेक गावात एसटी गाड्या वेळेत पोहचत नसल्याने प्रवासी नागरिकांच्या तक्रारी उद्भवत आहेत. त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन एसटी गाड्या वेळेत सोडण्यात याव्यात अशी सूचना खा. विनायक राऊत यांनी विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांना केली. त्याचबरोबर कुडाळ आगारात आगार व्यवस्थापक म्हणून श्री. पाटील (सहाय्यक यंत्र अभियंता) यांना त्वरित कायमस्वरूपी नेमणूक देण्यात यावी. विभागात आस्थापना पर्यवेक्षक हे पद तसेच विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी हे पद रिक्त असल्याने त्वरित वाहतूक पर्यवेक्षकांची नेमणूक आस्थापना पर्यवेक्षक म्हणून देण्यात यावी. सावंतवाडी आगारात डिझेल पंपावर तात्काळ शेड उभारण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. मार्ग तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या पूर्ववत करण्यात याव्यात. चालक वाहक पदातील कर्मचाऱ्यांना लिपिक पदात नेमणूक देताना बालसंगोपन, प्रसूती व वैद्यकीय रजा घेतलेल्या चालक वाहकांना परिपत्रकीय सूचनेनुसार त्वरित लिपिक पदात सामावून घेण्यात यावे. कुडाळ आगारातील वाहतूक निरीक्षक विकी गावडे यांची विनंती नुसार बदली विभागीय वाहतूक शाखेत करण्यात यावी या मागण्या एसटीचे विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांच्याकडे खा. विनायक राऊत यांच्या माध्यमातून एसटी कामगार सेना पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी केल्या.त्या मागण्यांवर श्री.पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मागण्या मान्य केल्या.


या बैठकीवेळी कणकवली विधानसभा प्रमुख सचिन सावंत,एसटी कामगार सेना जिल्हाअध्यक्ष अनुप नाईक,जिल्हा सचिव भगवान धुरी (आबा धुरी ), युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी,हेमंत राणे, वेंगुर्ला उपतालुकाप्रमुख अजित गावडे, सुमन कामत कामगार सेना प्रतिनिधी तसेच सर्व आगारातील पदाधिकारी व श्री. पुनाळेकर, श्री.भोगले, मिलिंद दळवी, श्री.मुणगेकर, राम येडके, विनोद कुलकर्णी, विष्णू जोशी,संदीप सावंत, महेश तावडे,अभिजित राणे, अमोल कदम, सुनील चव्हाण, अमोल परब,श्री.वळंजू कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा