*काव्यनिनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभाताई पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मागे वळून पहातांना*
*काव्यांजली*
आज अचानक
मागे पहातांना वळून
आल्या समजून
चुका ——–१
निस्वार्थ माझ्या
प्रेमाची झाली छळवणूक
हितशत्रूंची करमणूक
अनायासे ———२
भोळेपणा माझा
मलाच खूप नडला
विकास अडला
सर्वांगीण ——–३
विसरुनी आघात
नव्याने केली सुरवात
जीवन सुखात
सर्वार्थाने ——४
आपणच असतो
आपल्या जीवनाचे शिल्पकार
प्रयत्ने साकार
मनोरथ ——–५
आता आनंद
मागे वळून पहातांना
जगणे शिकतांना
आनंदोत्सव —–६
प्रतिभा पिटके
अमरावती