You are currently viewing केसीसी व दिलीप बिल्डकाँन या महामार्ग ठेकेदार कंपन्यांवर गुन्हा दाखल करा…..

केसीसी व दिलीप बिल्डकाँन या महामार्ग ठेकेदार कंपन्यांवर गुन्हा दाखल करा…..

राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षअनंत पिळणकर यांचे जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन

कणकवली

जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावर ठेकेदाराच्या चुकीच्या नियोजनामुळे होत असलेल्या अपघातांबाबत ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करावा,  अशी मागणी करत आज राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट देऊन निवेदन सादर केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनाही यावेळी निवेदन सादर केले.

दरम्यान याबाबत चौकशी करून संबधित दोषींवर कारवाई केली जाईल असे यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सांगितले. यावेळी देवेंद्र पिळणकर, रवीभूषण लाड आदी उपस्थित होते. तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी सांगितले.

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारेपाटण ते झाराप यादरम्यान मुंबई गोवा महामार्गाचे दोन ठेकेदारांच्या माध्यामातून काम सुरू आहे. खारेपाटण ते जानवली या टप्प्यात केसीसी प्रायव्हेट लिमिटेड व जानवली ते झाराप या टप्प्यात मे. दिलीप बिल्डकॉन ही कंपनी काम करत आहे.

नुकताच जानवली रातंबी व्हाळ या ठिकाणी दोन ट्र्कमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 9 जन जखमी झाले. यापूर्वी याच ठिकाणी दोन मोटरसायकल स्वार समोरासमोर धडकून या अपघातात 3 जन जागीच ठार झाले होते. तसेच कुडाळ, झाराप या पाट्यातही यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत.

या अपघाताना प्रामुख्याने ठेकेदारांचे वाहतुकीचे नियोजन करणीभूत आहे. अनेक ठिकाणी महामार्गावर एकमार्गी वाहतूक सुरू आहे. तर काही ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे. अशा ठिकणी ठेकेदारांकडून वाहन चालकाना योग्य सूचना दिल्या गेलेल्या नाहीत. किंबहुना तसे दिशादर्शक किवा मार्ग परिवर्तनाचे फलक लावले गेलेले नाहीत. त्यामुळे अचानक वाहने एकमेकासमोर येऊन अपघात घडत आहेत.

तरी याबाबतीत आपले स्तरावर संबधित ठेकेदारला या अपघातला जबाबदार धरून या ठेकेदारवर गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही यावेळी देण्यात आला.

दरम्यान याबाबतीत सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कारवाईचे संकेत दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा